महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कटकारस्थान हाणून पाडले : मुख्यमंत्री ठाकरे - We thwarted the conspiracy to discredit Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कटकारस्थान हाणून पाडले : मुख्यमंत्री ठाकरे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र देष्टांनी केला आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कटकारस्थान आम्ही हाणून पाडले," असे व्यक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं

मुंबई : "कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र देष्टांनी केला आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा कटकारस्थान आम्ही हाणून पाडले," असे व्यक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. "कोरोना काळात महाराष्ट्रात परदेशी कंपन्यांशी करार करण्यात आला. 17 हजार कोटींचा करार राज्य सरकरानं परदेशी कंपन्याशी करून राज्याच गुंतवणूक केली आहे," असे ठाकरे यांनी सांगितले. 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, "राज्यात अतिवृष्टी आणि निर्सग संकटामुळे सोन्यासारखी पिके वाहून गेली आहे. जून ते आँक्टोंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात 41 लाख हेक्टर जमीन बाधित झाली आहे. अनेक शेतकऱ्याची जमीन वाहून गेली. काही जणांचा मृत्यू झाला आहे. या संकटावर मात करण्यासाठी 10 हजार कोटी रूपयांची तरतूद राज्य सरकारनं केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. राज्यावर संकट येत असताना राज्यावर येणारं संकट हे माझ्यावर आलेले संकट आहे. माझे सरकार अडचणीत आहे, असं म्हणून सहकार्य केलं. हा विश्वास जनतेनं सरकारवर दाखविला आहे. 

अतिवृष्टी आणि अन्य संकटामुळे काही महिन्यापासून कापूस केंद्र बंद आहेत. याबाबत ठाकरे म्हणाले, "येत्या महिन्याभरात राज्यातील कापूस केंद्र सुरू करण्यात येणार आहेत."  माजी सैनिक आणि शहीदांच्या कुंटुबियांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कर माफ करण्याची योजना सुरू करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

 

 दिवाळीनंतर लॅाकडाऊनची वेळ येऊ देऊ नका 
मुंबई : दिवाळी जवळ आलीये. समृद्धी आपल्या सर्वांच्या आयुष्यात येवो. हे सगळे होळीपासून सुरु झाले. दिवाळीच्या शुभेच्छा देतोय. आज देशाच्या राजधानीत, अन्य देशांत कोरोनाची पुन्हा लाट आली आहे. ही लाट नसून त्सुनामी आहे. त्यामुळे संयम राखून दिवाळी साजरी करा. लाॅकडाऊन लावण्याची वेळ आली तर त्याचे अर्थचक्रावरचे भयानक असतील. त्यामुळे ही दिवाळी साधेपणाने व फटाके न वाजवता साजरी करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

ते म्हणाले, "आपण होळीपासून पुढचे सण अत्यंत संयमाने साजरे केले. गणेशोत्सव, दहीहंडी, ईद, अन्य समाजाचे सण-उत्सव घरात साजरे केले. तुम्ही सहकार्य केले म्हणूनच आपण दोघेही थोडे तणावमुक्त आहोत. दुसरी लाट येऊ नये ही चिंता आणि प्रार्थना आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. आता दिवाळी आली. जवळपास सगळे काही उघडले आहे. गर्दी वाढते आहे. जिवंतपणाचे लक्षण आहे. खबरदारी घ्यावी ही विनंती करायला संवाद साधत आहे.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख