आम्हीच मुख्यमंत्र्यांना एकाच ठिकाणी बसण्यासाठी सांगितले : शरद पवार

प्रशासनाबाबतचे निर्णय घेण्यासाठी आम्हीच मुख्यमंत्र्यांना एकाच ठिकाणी बसण्यासाठी सांगितले आहे
cm.jpg
cm.jpg

उस्मानाबाद : राज्यात पुरग्रस्त शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून राज्याचा कारभार करीत आहेत, ठाकरे यांनी घराबाहेर पडून पुरग्रस्तांची पाहणी करावी. या संकटात लढण्यासाठी जनतेला, शेतकऱ्यांना  बळ द्यावे, अशी अपेक्षा विरोधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार केली जात होती. आज मुख्यमंत्री हे पुरग्रस्तभागाची पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. ते सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दैाऱ्यावर आहेत. 

मुख्यमंत्री घरात बसूनच राज्याच्या कारभार करतात, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, "राज्याच्या कारभार करण्यासाठी प्रशासनाला नियोजन करून काही निर्णय घ्यावे लागतात. प्रशासनाबाबतचे निर्णय घेण्यासाठी आम्हीच मुख्यमंत्र्यांना एकाच ठिकाणी बसण्यासाठी सांगितले आहे."

ज्येष्ठ नेते शरद पवार मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र अजूनही घरात बसूनच अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेण्यात मग्न आहेत, महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. अशा स्थितीत ते मात्र घरात बसून महाराष्ट्राच्या नकाशावर पूरस्थितीची पाहणी करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यावर विरोधकांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस नितेश राणे यांनीही ही या मुद्द्यावरून टीका  केली होती.  आता ८० वर्षांचे पवार दौरा करून मुख्यमंत्र्यांपुढे उदाहरण घालून देत आहेत. यातून तरी मुख्यमंत्री शिकून घराबाहेर पडणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. 


मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यावर याबाबत टीका केली होती. "मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो. पण, आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाइन (online) बघता येणार नाही. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या; अन्यथा लोकांचा "ठाकरे' नावावरील विश्वास उडेल," असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल दिला होता. यावर कृषीमंत्री दादा भुसे यांनी नांदगावकर यांना उत्तर दिले होते

 “माझ्यासारखे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी घटना घडत आहेत, त्या-त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. पाहणी करुन त्याचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करत आहोत. दर आठवड्यात कॅबिनेट बैठकीत या विषयावर चर्चा होते आहे. मला संबंधितांना सांगायचे आहे की एक ते दीड महिन्याच्या कालावधीत कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी 6 वेळा बैठका घेतल्या आहेत. त्याचं प्रारुप तयार करुन लवकरच त्यावर अंमलबजावणी होणार आहे," असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 

सध्याच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे, त्याला शेताच्या बांधावर जाऊन दिलासा देण्याची गरज आहे. अशा वेळी नेहमीप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने पंचनाम्याचा आदेश देऊन भागणार नाही, तर या संकटातून पुन्हा उभे राहण्यासाठी त्याला मानसिकदृष्ट्या आधार देण्याची गरज आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेताच्या बांधावर जाऊन हे काम करावे, अशी अपेक्षा नांदगावकर यांनी ट्विटमधून केली आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना महामारीच्या काळात घराबाहेर पडून पाहणी करावी. या संकटात लढण्यासाठी जनतेला बळ द्यावे, अशी अपेक्षा विरोधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार केली जात होती. पण, ठाकरे यांनी पुणे दौरा सोडता घरातूनच कारभार हाकला आहे. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी ठाकरे यांच्यावर टिकेची झोड उठवली होती. पण, मनसेने आत्तापर्यंत ठाकरे यांच्यावर थेट टिका केली नव्हती. 

तोच धागा पकडून नांदगावकर यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्रीजी आतापर्यंत तुमच्यावर थेट टिका करण्याचे टाळत आलो आहे. आता मात्र शेतकऱ्यांचे अश्रु तुम्हाला ऑनलाइन पुसता येणार नाहीत. त्यासाठी तुम्ही घराबाहेर पडा आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांचे डोळे पुसा. त्यांना तातडीने आर्थिक मदत द्या; अन्यथा लोकांचा ठाकरे नावावर असणारा विश्‍वास उडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. 
 Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com