मराठा तरुणांच्या आयुष्याशी सरकार खेळत आहे ...विनायक मेटेंचा आरोप - Vinayak Mete has once again attacked the state government | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा तरुणांच्या आयुष्याशी सरकार खेळत आहे ...विनायक मेटेंचा आरोप

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

सरकार मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याशी खेळत आहे,' असा गंभीर आरोप मेटे यांनी केला आहे. 

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्ला चढविला आहे. 'मराठा आरक्षणावरील तात्पुरती स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सदोष याचिका दाखल केली आहे. हे सरकार मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याशी खेळत आहे,' असा गंभीर आरोप मेटे यांनी केला आहे. 

मराठा आरक्षणाबाबत पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
मेटे म्हणाले की राज्य सरकारने 28 जुलै 2020 च्या परिपत्रकातून मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून वगळण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने सारवासारव सुरू केली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, 'सारथी' संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजनेसाठी निधी मंजूर केला. मात्र, मराठा समाजातील तरुणांची संख्या पाहता या योजनांमधील निधी पुरेसा नाही. तसेच या निधीचा वापर कसा करणार याबाबत सरकारकडून स्पष्टता नाही.

पुण्यात शनिवारी विचार मंथन बैठक

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात एकसूत्रता येण्यासाठी शनिवारी (ता.3) पुण्यात विचार मंथन करण्यात येणार आहे. या बैठकीस मराठा समाजातील माजी न्यायमूर्ती, विचारवंत, तज्ज्ञ, विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, असे विनायक मेटे यांनी सांगितले.
 

मोदींना मला एकट्याला जाऊन भेटणं शक्य झालं असतं..पण 
 
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार संभाजीराजे छत्रपती यांना भेटण्यासाठी वेळ देत नसल्याच्या निषेधात काल कोल्हापूर महानगरपालिकेतील सभा तहकूब करण्यात आली. मराठा आरक्षणाबाबतची भूमिका पंतप्रधान मोदी स्पष्ट करत नाहीत. याविषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केला आहे. महापौर निलोफर आजरेकर यांनी याबाबतची भूमिका मांडली. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवरून एक पत्र प्रसिद्ध केलं आहे. या पत्रात संभाजी राजे यांनी म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींना मला एकट्याला जाऊन भेटणं आणि श्रेय घेणं शक्य झालं असतं. मी ठरवलं तर कधीही भेटू शकतो. पण मला मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रेयवाद आणायचा नाही. हा लढा सर्वांचा आहे. तो सर्वांना सोबत घेऊन लढायचा आहे.

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख