विकास दुबेला मिळणार होत विधानसभेचं तिकीट...

विकास दुबेला विधानसभेचं तिकीट मिळणार होते, पण त्याने आत्मसर्मपण केले नाही म्हणून त्याला तिकीट मिळालं नाही.
Sanjay Raut1.jpg
Sanjay Raut1.jpg

मुंबई : कुख्यात गुंड विकास दुबे याच्या एनकांउटरच्या घटनाक्रमांविषयी विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी उत्तरप्रदेश सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. जे विकास दुबेला मदत करीत होते, अशा व्यक्ती आता या एनकांउटरमुळे वाचल्या आहेत. विकास दुबे याच्या एनकाउंटरमागे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आणखी एक गैाप्यस्फोट केला आहे. 

मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ''दहशत निर्माण करण्यासाठी, खंडणी जमा करण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी विकास दुबे यांच्यासारखी माणसं राजकारणी, पोलिस अधिकारी तयार करीत असतात. या साऱ्याना राजकारण जबाबदार असतं. विकास दुबेला विधानसभेचं तिकीट मिळणार होते, पण त्याने आत्मसर्मपण केले नाही म्हणून त्याला तिकीट मिळालं नाही.'' पोलिसांचं खच्चीकरण करणारी वक्तव्यं केली जाऊ नयेत, असं आवाहन करीत संजय राऊत यांनी विकास दुबे याच्या एनकांउटरचं समर्थन केलं नाही.   

कॅाग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही या एनकांउटरबाबत शंका उपस्थित केली आहे. त्यांनी सरकारवर टिका केली आहे. याबाबत प्रियंका गांधी यांनी एक टि्वट केले आहे. आपल्या टि्वटमध्ये प्रियंका गांधी म्हणतात, ''गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्यांचे आता का होईल..?'' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. विकास दुबे मारला गेल्यामुळे उत्तर प्रदेशचे सरकार पलटण्यापासून वाचले, अशी प्रतिक्रिया या राज्याचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी व्यक्त केली आहे. दुबेला घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यातली मोटार पलटल्यानंतर विकास दुबेचा एनकाऊंटर झाला, असा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. त्याला उद्देशून यादव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
  
कानपूर येथे आठ पोलिसांची हत्या कऱणारा आणि सात दिवस पोलिसांना गुंगारा देणार कुख्यात गुंड विकास दुबे हा आज सकाळी पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. कानपूरच्या जवळ ही घटना घडली. विकास दुबे याला मध्यप्रदेशातील उज्जैन येथून काल सकाळी अटक करण्यात आली होती. त्याला पोलिस उज्जैन येथून कानपूरला आणत असताना पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. त्यावेळी विकासने एका पोलिसाची बंदूक हिसकावून पऴून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी शरण येण्यास सांगितले होते. विकासने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. या चकमकीत तो ठार झाला आहे. 

विकास दुबे एकांउटर बाबत बॅालिवुडचे दिग्दर्शक ओनिर यांचे टि्वट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या टि्वटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या टि्वटमध्ये ओनिर म्हणतात, यांनी म्हटले आहे ''विकास दुबेचे एनकांउटर खूप लाजीरवाणी बाब आहे. त्याचा एनकांउटर हा पूर्वनियोजित होता का..असं एनकांउटर होण्याबाबत भविष्यवाणी केली होती का... असं एनकांउटर होण्यासाठी वाट पाहत होते का.. वास्तविक या प्रकरणात अनेक राजकीय आणि शक्तीशाली व्यक्तीचा संबध असल्याचा माहिती उघडकीस आली असेल. हे एनकांउटर म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे.'' 
Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com