शरद पवारांच्या आवाहनाला वसंतदादांच्या नातवाचा प्रतिसाद 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी कोविड रुग्णालय उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यामार्फत 100 खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी सांगली महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली आहे.
Vasantdada Patil's grandson responds to Sharad Pawar's appeal
Vasantdada Patil's grandson responds to Sharad Pawar's appeal

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी कोविड रुग्णालय उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यामार्फत 100 खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी सांगली महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली आहे. 

सांगली येथील वसंतदादा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असलेल्या जागेवर तातडीने हे कोविड हॉस्पिटल उभा करण्याची आमची तयारी आहे,' असेही कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी सांगितले. 

"आपल्या सगळ्यांना कोरोना साथीच्या विरोधात ताकदीने लढाई करायची आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संकट अत्यंत मोठे आहे. सरकारच्या यंत्रणेला कोरोनाशी लढताना काही मर्यादा येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना आवाहन करून तातडीने कोविड हॉस्पीटल उभा करण्यास सांगितले आहे.

वसंतदादा पाटील यांचे कुटुंबीय नेहमीच जनतेच्या हितासाठी अग्रेसर राहिले आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे या पूर्वी करण्यात आलेली आहेत. कोरोना साथीच्या काळात पहिल्या टप्प्यातच वसंतदादा सहकारी साखर कारखान्याने सॅनिटायझरचे उत्पादन करून ते अनेक गावांमध्ये मोफत वाटप केले होते. त्यानंतर ते अल्पदरात नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती विशाल पाटील यांनी दिली. 

"आयसोलेशन व क्वारंटाइनसाठी वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. आता सांगली जिल्ह्यात तसेच सांगली महापालिका क्षेत्रात वाढणारा कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन कारखाना कार्यस्थळावर तातडीने शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल उभा करण्याची आमची तयारी आहे. त्यासाठी आम्ही सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांना तसा प्रस्तावही सादर केला आहे,' असे विशाल पाटील यांनी सांगितले. 

सभासदांच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडेही रुग्णालय उभारणीबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी जागेची पाहणी केलेली आहे. सरकारच्या वतीने हे कोविड रुग्णालय चालवावे किंवा त्यांची अडचण असल्यास आम्हीही हे रुग्णालय चालविण्याची तयारी दर्शविली आहे. ऑक्‍सिजन पुरवठ्यासहीत हे कोविड रुग्णालय उभारण्याचा आमचा प्रस्ताव आहे. तो तातडीने मंजूर केल्यास रुग्णांची चांगली सोय होईल,' असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com