राजगृहावरील हल्ल्याची 'सीआयडी'मार्फत चौकशी करा: आठवले 

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ निवासस्थान आहे. त्यामुळे राजगृह ही पवित्र वास्तू आहे.
union minister ramdas athawale demands CID inquiry in rajgrah incident
union minister ramdas athawale demands CID inquiry in rajgrah incident

मुंबई :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक वास्तूवर झालेल्या हल्ल्याच्या तीव्र निषेध करून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या हल्ल्याची सीआयडी द्वारे चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठविले आहे. 

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ निवासस्थान आहे. त्यामुळे राजगृह ही पवित्र वास्तू आहे. ही वास्तू ग्रंथांसाठी म्हणून उभारलेली एकमेव वास्तू ठरू शकते. जगभरातील आंबेडकरी अनुयायांचे राजगृह प्रेरणास्थान, ऊर्जास्थान आहे. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असणा-या राजगृह या वास्तूवर हल्ल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे. राजगृहाचा अवमान करण्याचा हा पहिलाच निंदनीय प्रकार आहे. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा करावी. या मागे कुणाचा हात आहे हे शोधण्यासाठी या हल्ल्याची सीआयडीद्वारे सखोल चौकशी करावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

जळगावातील नेत्यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

जळगाव : राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव, मालेगाव दौरा म्हणजे केवळ लोकभावना भडकविण्याचे उद्योग आहेत, अशी टीका कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.

फडणवीस हे आज मालेगाव व जळगाव दौऱ्यावर येत आहेत. जळगाव येथे सद्यस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांचा जनता लॉकडाऊन केला आहे. अशा स्थितीत फडणवीस यांचा दौरा होत असल्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. कॉंग्रेसचे आमदार शिरीश चौधरी यांनी याबाबत म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रातील दौरे म्हणजे केवळ लोकभावना भडकविण्याचे उद्योग आहेत. राज्यात ‘कोरोना’ची स्थिती वाढत असतांना त्यानी केंद्र सरकारकारकडून मदत आणण्याची गरज आहे. मात्र ते केवळ दौरे करीत फिरत असून महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना भडकविण्याचे काम करीत आहे. आजच्या परिस्थितीत त्यांनी राजकारण न करता राज्यातील परिस्थिती नियंत्रणात कशी येईल याबाबत विचार केला पाहिजे. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत राज्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील सत्तेवर पुन्हा येण्याचा देंवेद्र फडणवीस यांचा प्रयत्न होता. मात्र जनतेने तो हाणून पाडला आहे. त्यांनी सत्तेसाठी अनेक मार्ग करून पाहिले ते यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे हे सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ‘कोरोना’सारख्या महामारीच्या रोगाचेही ते राजकारण करीत आहेत. महाराष्ट्रात दौरे करून राजकारण
करण्यापेक्षा त्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आज जळगाव शहरातील वाढता संसर्ग रोखण्यसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यु जारी केला आहे. अशा स्थितीत फडणवीस जळगावात येत आहेत. त्यांच्या भोवती अधिकारी व पक्षाच्या पदाधिकऱ्यांचा गराडा असेल त्यामुळे परिस्थिती बिघडल्यास जबाबदार कोण असेल? याचेही उत्तर त्यांनी द्यावयाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com