उद्धवजी..., तुमची प्रतिमा कशीही असू; महाराष्ट्राची प्रतिमा तरी जपा 

उद्धवजी, आता तरी जनतेची दिशाभूल करणं सोडा.
Uddhavji ...., whatever your image; But Preserve the image of Maharashtra
Uddhavji ...., whatever your image; But Preserve the image of Maharashtra

मुंबई : उद्धवजी, राज्य कोरोनासारख्या महामारीच्या संकटात आहे आणि तुम्ही 6 कोटी रुपये जनसंपर्कावर करण्याचा गोष्टी करत आहात? स्वतःची शोभा वाढविण्याच्या गोष्टी करत आहात, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा जनतेसमोर मांडण्यासाठी तब्बल सहा कोटींच्या कंत्राटाची निविदा काढण्यात आली आहे, असा आरोप केला आहे. 

दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही शनिवारी (ता. 19 सप्टेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असाच आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांची इमेज घसरत चालल्यामुळे साडेपाच कोटींचे सोशल मीडियासाठी कंत्राट काढण्यात आले आहे, असे सोमय्या यांनी आरोपात म्हटले होते. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, "जनसंपर्क विभागालाही जर हे पैसे खर्च करायचेच आहेत, तर ते जनतेमध्ये कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी खर्च करायला हवेत. तुमची ओळख तेव्हाच सुधारेल जेव्हा तुम्ही केवळ जनसंपर्क नाही, तर खऱ्या अर्थाने जनहितार्थाचे कर्तव्य पार पाडाल.' 

उद्धवजी, आता तरी जनतेची दिशाभूल करणं सोडा, या मथळ्याखाली चंद्रकांत पाटील यांनी पत्रक ट्‌विट केले आहे. त्यात म्हटले आहे की महाराष्ट्र सरकारने एका खासगी संस्थेला स्वतःच्या जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी काही दिवसांपूर्वी सुमारे सहा कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. 

राज्य सरकारला असे वाटत आहे की जनतेचा त्यांच्याविषयी असलेला दृष्टीकोन बदलण्यात त्या संस्थेने मदत करावी. म्हणजे सरळ सरळ जनतेची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या दिशेने नेण्यास परावृत्त करावे. 

त्या सहा कोटी रुपयांमध्ये 25 ते 30 हजार जणांच्या कोरोना चाचण्या होऊ शकल्या असत्या, हा तरी विचार राज्य सरकारने करायला हवा होता. उद्धवजी, तुमची प्रतिमा चांगली वाईट कशीही असो. या कठीण काळात कमीत कमी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होणार नाही, याची तरी काळजी घ्या, असा सल्लाही चंद्रकांतदादांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. 

किरीट सोमय्या यांनीही केला होता आरोप 

मुख्यमंत्र्यांची इमेज घसरत चालल्यामुळे साडेपाच कोटींचे सोशल मिडियासाठी कंत्राट काढण्यात आले आहे. कोव्हीड-19 साठी चांगले काम केले असते तर त्यांची इमेज घसरली नसती अशी टिका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेचे विरोधक अशी प्रतिमा असलेले किरीट सोमय्या यांनी केली होती 

कोव्हिड रुग्णांवर खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. प्रामाणिक काम करा असा सल्ला देताना सोमय्या म्हणाले, की सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांना जेलमध्ये टाकणे बंद करा, अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात इमानदारीने तपास करा, नेव्ही अधिकाऱ्यांची मारहाण थांबवा, चांगल काम केले तर इमेज घसरणार नाही आणि इमेज सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार नाहीत, याकडेही सोमय्या यांनी लक्ष वेधले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com