उदयनराजे म्हणाले, "मराठा संघटनांमध्ये इगो प्रॅाब्लेम...आरक्षण हे गुणवत्तेनूसारच दिले पाहिजे.." - Udayan Raje said Ego problem in Maratha organizations Reservation should be given according to merit  | Politics Marathi News - Sarkarnama

उदयनराजे म्हणाले, "मराठा संघटनांमध्ये इगो प्रॅाब्लेम...आरक्षण हे गुणवत्तेनूसारच दिले पाहिजे.."

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

"आरक्षणामुळे माणसे दूरावली जात आहेत. माझ्या मते आरक्षण हे गुणवत्तेनूसारच दिले पाहिजे," असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी   येथे व्यक्त केले

सातारा :  "आरक्षणामुळे माणसे दूरावली जात आहेत. माझ्या मते आरक्षण हे गुणवत्तेनूसारच दिले पाहिजे," असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी काल (गुरुवार) येथे व्यक्त केले. 

सातारा पालिकेच्या उपाध्यक्षपदी मनोज शेंडे यांची बिनविरोध झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले हे पालिका कार्यालयात आले. तेथे त्यांनी उपाध्यक्ष मनोज शेंडे यांचे अभिनंदन केले. त्यानंतर पत्रकारांनी उदयनराजेंना मराठा आरक्षणासाठी विषयावर छेडले. त्यावर उदयनराजेंनी मी सर्वधर्म, जाती समाज समभाव मानतो. राज्यातील मराठा समाजातील संघटनांमध्ये इगो प्रॅाब्लेम असल्याचे उदयनराजेंनी नमूद केले.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, "मी मराठा म्हणून कधी मला संबोधले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वधर्मभावाची शिकवण दिली. तीच आजही अंमलात आणली आहे. माझ्याकडे सर्व जाती धर्माचे लोक कार्यरत आहेत. लहानपणी गोट्या, विटया दांडू खेळायचो. तेव्हा तुम्ही पाहायचा का हा इथला तो तिथला. या आरक्षणामुळे लोक एकमेकांशी बोलण्याचे बंद झाले. कूठला हा दृष्टीकोन." 

हेही वाचा : शरद पवारांना मराठा समाजा व्यतिरिक्त इतरांचे प्रश्न सोडवायला वेळ.

बीड: सरकार मधील मंत्री विजय वडेट्टीवार संविधनाचा भंग करताहेत, त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार मध्ये ठेवलं कस? त्यांना काढून टाकायची आपल्यात हिंमत नसेल तर सरकार चालवायला आपण सक्षम नाहीत असे
आम्ही समजू. सत्तेचा मोह असल्यामुळे तुम्ही गप्प आहात. मात्र, माझ्या पश्चात शिवसेनेच्या वाघाची शेळी झाली, याचे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दुःख होत असेल, अशी तिखट टिका शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक
मेटे यांनी केली. शरद पवारांना मराठा समाज सोडून इतर समाजांचे प्रश्न सोडवायला वेळ असल्याची टिकाही मेटे यांनी यावेळी केली.गुरुवारी (ता. पाच) शहरात मराठा आरक्षण विद्यार्थी व युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेटे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. परिषदेला गायकवाड आयोगाचे माजी सदस्य व माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञ श्रीराम पिंगळे, ॲड. अमोल करांडे, नारायगणडाचे मठाधिपती शिवाजी महाराज, लक्ष्मण महाराज मेंगडे, लक्ष्मण महाराज रामगडकर, सनदी लेखापाल बी. बी. जाधव, प्रभाकर कोलंगडे, सुदर्शन धांडे उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या मुद्याला हात घालत मेटे यांनी सुरुवातीलाच अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. मेटे म्हणाले, मंत्री अशोक चव्हाण मराठा आरक्षणा संदर्भात कुंभकर्णाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्यामुळेच मराठा समाजावर ही वेळ आली. मराठा समाजाला बरबाद करायचं काम अशोक चव्हाण करत आहेत का, याचे उत्तर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी द्यावे. वडेट्टीवार यांना ओबीसीचा मसिहा बनायचं आहे म्हणून इतर समाजला ते दूषणे देत आहेत. मात्र तुम्ही मराठा समाजाचे वाईट चिंतु नका, असा टोलाही लगावला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख