स्थानिक रोजगार निर्मितीसाठी पर्यंटनाला चालना देणार : उद्धव ठाकरे 

"पर्यटन विकास आराखड्याबाबत बैठक घेऊन येथील पर्यंटनाला सरकार चालना देणार," असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
cm10.jpg
cm10.jpg

कोयनानगर : "पाटण तालुक्यात पर्यंटनाला मोठा वाव आहे. या पर्यटन विकासातून स्थानिकांना रोजगार निर्मिती होऊ शकतो. सर्वांनी एकत्र बसून पाटण तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करावा, अधिवेशनानंतर या पर्यटन विकास आराखड्याबाबत बैठक घेऊन येथील पर्यंटनाला सरकार चालना देणार," असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना धरणाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार अनिल बाबर, जलसंपदा विभागाचे सचिव संजय घाणेकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास रजपूत, जलसंदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे आदी उपस्थित होते.

प्रारंभी जलसंदा विभागाचे सचिव घाणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे शक्तिपीठ कोयना प्रकल्प पुस्तिका व स्मृतीचिन्ह देवून स्वागत केले. यानंतर त्यांनी कोयना धरणाची संपूर्ण माहिती दिली. कोयना धरणाची पाहणीनंतर अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.

कोयना धरणावरील जुनी मशिनरी बदलणार..
कोयनानगर : "कोयना धरण प्रकल्पात 1964 आणि 1990 मध्ये काही मशिनरी बसविण्यात आलेल्या आहेत. त्या खराब झाल्या आहेत. त्या मशिनरी बदलण्याबाबतची चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात झाली,' अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज (ता. 10 डिसेंबर) कोयना धरणाला धावती भेट देत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी धरणाच्या भिंतीवरून प्रकल्पाची पाहणी करून अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. मुख्यमंत्री गेल्यानंतर सहकार मंत्री पाटील, शंभूराजे देसाई यांनी एकत्रित पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री पाटील म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी (ता. 10 डिसेंबर) सकाळी दहा वाजता हेलिकॉप्टरने आले. त्यानंतर ते पोफळीकडे रवाना झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com