These leaders are increasing the importance of Fadnavis over Modi ... | Sarkarnama

मोदींपेक्षा फडणवीस यांचे महत्व 'हे' नेते वाढवत आहेत...

संपत मोरे
गुरुवार, 9 जुलै 2020

चंद्रकांत पाटील हे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा फडणवीस यांचे महत्व वाढवत आहेत," असे  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड यांनी म्हटले आहे.

पुणे : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांना दोन दिवसात जमले असते, असे चंद्रकांत पाटील यांना म्हणायचे आहे काय ? चंद्रकांत पाटील हे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा फडणवीस यांचे महत्व वाढवत आहेत," असे  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड यांनी म्हटले आहे.

"नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा फडणवीस यांची कार्यक्षमता जास्त आहे असेच चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या विधानातून सूचित करायचे आहे. ते फडणवीस यांचे महत्व वाढवत आहेत, " असे लाड म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी 'देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाचा विषय दोन दिवसात संपवला असता," असे विधान करत राज्य सरकारवर टिका केली होती. त्याला लाड यांनी उत्तर दिले आहे.

"चंद्रकांत पाटील हे वाचाळ बडबड करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडॉउन घोषित केले. त्यांनी प्रयत्न करूनही त्यांना कोरोनाच्या संकटावर तोडगा काढता आलेला नाही. जे मोदी यांना जमले नाही ते फडणवीस यांना दोन दिवसात जमले असते, असे सांगून फडणवीस यांचे मोदीपेक्षा महत्व वाढवत आहेत का? " असे लाड म्हणाले.

"कोरोनाच्या काळात भाजप राजकारण करत आहे. हा काळ एकीने लढण्याचा आहे मात्र, भाजपमधील चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते बडबड करत आहेत, असे फक्त तेच बोलू शकतात," असेही लाड म्हणाले. "समाजकारण करत असताना राजकारण करणे चुकीचे आहे. मात्र, अशा काळात राजकारण करणे भाजपला महागात पडू शकते. त्यांचे राजकारण ज्या जनतेच्या विश्वासावर उभे आहे. ती जनता त्याना केंद्रातील सत्तेतून हाकलून लावेल," असे लाड म्हणाले.

 Edited  by : Mangesh Mahale

हेही वाचा : 'सारथी'ची सूत्रे आता अजित पवारांकडे....

मुंबई : सारथी संस्थेला उद्या आठ कोटी रूपयांच्या निधी दिला जाणार असून ही संस्था आता नियोजन विभागाच्या अखत्यारित येणार आहे. नियोजन विभाग हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. सारथीच्या विविध प्रश्नावर आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 
मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विनायक मेटे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, ''सारथी संस्था बंद पडणार नाही. संस्थेची स्वायत्तता कायम राहिल. संस्थेच्या काही प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीसमोर मांडण्यात येणार आहे. संस्थेचा कारभार पारदर्शक कसा होईल. याकडे लक्ष दिले जाईल. संस्थेबाबत राज्य सरकार सकात्मक आहे.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख