मध्यरात्री एकपर्यंत चर्चा करून काँग्रेसच्या अंतिम यादीतील ही आहेत नावे..

राज्यपाल नियुक्त आमदारासाठी काँग्रेसची काल मध्यरात्री एक वाजेपर्यंत विधान परिषद उमेदवारांबाबत खलबते झाली. या बैठकीत आतापर्यंत काही नावे अंतिम झाली आहे.
Legislative Council - Copy.jpg
Legislative Council - Copy.jpg

मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारासाठी काँग्रेसची काल मध्यरात्री एक वाजेपर्यंत विधान परिषद उमेदवारांबाबत खलबते झाली. या बैठकीत आतापर्यंत काही नावे अंतिम झाली आहे. 

रजनी पाटील किंवा मोहन जोशी, माणिक जगताप किंवा मुझफर हुसेन, सचिन सावंत किंवा नसीम खान, नगमा, उर्मिला मातोंडकर किंवा अनिरुद्ध वनकर ही नावे अंतिम झाल्याचे समजते. दुपारी एक वाजता मंत्रीमंडळाची बैठक आहे. या बैठकीआधी ही नावे बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात येणार आहेत.  

राज्यपालनियुक्त सदस्य हे कला समाजसेवा या क्षेत्रातले असावेत हा निकष असल्याने राजकीय नेत्यांची नावे पुढे केली जाणार नसल्याचेही सांगण्यात येते आहे. विधानपरिषदेवरील १२ राज्यपालनियुक्त जागांसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष चार चार नावांचा बंद लिफाफा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध लक्षात घेता ही नावे मान्य केली जातील काय याबाबत शंका आहे. 

शिवसेनेने समाजसेवा साहित्य कलाक्रीडा या क्षेत्रातील नावेच पुढे पाठवण्याचे जवळपास ठरवले आहे. समाजसेविका सिंधुताई सपकाळ, अभिनेते आदेश बांदेकर, सुबोध भावे यांची नावे निश्चित झाली आहेत. युवासेनेला प्रतिनिधित्व की उध्दव ठाकरे यांची सावली म्हणून वावरणारे मिलिंद नार्वेकर असा तिढा आहे. राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्या सेनेला सोडण्याच्या काळात सुभाष देसाई, संजय राउत आणि मिलिंद नार्वेकर या तिघांनी उद्धव ठाकरेंची साथ दिली. त्यातील नार्वेकर यांना अद्याप राजकीय पद मिळाले नाही, मात्र, त्यांचा विचार होणार की त्यांचे महत्व कमी करण्यासाठी युवा सेनेतील नवा चेहरा समोर आणणार यावर ठाकरेंनाच निर्णय घ्यावा लागेल. 

राष्ट्रवादीतही हालचाली महाविकास आघाडीतला तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनेही हालचाली सुरु ठेवल्या आहेत. राज्यपाल निकषात बसणारी नावेच मान्य करतील हे लक्षात घेत एकनाथ खडसे , राजू शेटटी यांची नावे पुढे पाठवायची का याबाबत उच्चस्तरावर खल झाला. खडसे यांची कन्या रोहिणी यांचे सहकार क्षेत्रातील काम लक्षात घेता त्यांचे नाव पाठवायचे असेही विचारात आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नेमणुकीमध्ये उशीर झाला नसल्याचे सांगितले आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत चर्चा चर्चा होणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विधानपरिषदेच्या जांगावरुन कोणतेही मतभेद नाहीत. कोरोनामुळे निर्णय घेण्यात आला नाही, असही ते म्हणाले
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com