राज्य सरकारमधील घटक पक्षात ताळमेळ नाही.. प्रवीण दरेकरांचा आरोप - There is no coordination among the constituent parties in the state government  Praveen Darekar's allegation | Politics Marathi News - Sarkarnama

राज्य सरकारमधील घटक पक्षात ताळमेळ नाही.. प्रवीण दरेकरांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

"महाविद्यालये बंद आहेत, परीक्षा नाहीत, अभ्यासिका बंद आहेत, त्यामुळे सरकारचे धोरण कळत नाही.  राज्य सरकारमधील घटक पक्षांत ताळमेळ नाही," असा आरोप  प्रवीण दरेकर यांनी  केला.

पुणे : "महाविद्यालये बंद आहेत, परीक्षा नाहीत, अभ्यासिका बंद आहेत, त्यामुळे सरकारचे धोरण कळत नाही. या मतदारांत चीड आहे.  राज्य सरकारमधील घटक पक्षांत ताळमेळ नाही," असा आरोप विधान परिषदेतील विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी दरेकर आले होते. 

प्रवीण दरेकर म्हणाले, "भाजपने केलेली कामे आणि पक्षाची भविष्यातील धोरणे पाहता या पक्षावर पदवीधरांचा विश्वास आहे. त्यामुळे संग्राम देशमुख यांना मतदारांची पसंती मिळेल. भाजपचे देशमुख निवडून आल्यास पदवीधरांना नोकरी मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू. या घटकाला उद्योग क्षेत्रात प्रोतसाहन देऊ."

पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातूनही तिकिट न मिळाल्याने पुण्यातील इच्छुक महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, राजेश पांडे नाराज नाहीत. कुलकर्णी नाराज नाहीत, त्यांची काळजी भाजप घेईल. आमच्याकडे मतभेद नाहीत. राज्य सरकारमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीचे नेते कॅाग्रेसची फरपट करीत आहे. हे या पक्षाला कळायला हवे, असे दरेकर यांनी स्पष्ट केलं. 

 
हेही वाचा : भाजपमधील उपऱ्या हिंदुत्ववाद्यांचे ढोंग जनताच उघडे पाडेल... शिवसेनेची टीका 

 मुंबई : भाजपने आंदोलन केले म्हणून देवांचे दरवाजे उघडले वगैरे बतावण्या करणे म्हणजे अकलेचे उरलेसुरले भांडवल दिवाळखोरीत निघाल्याचे प्रमाण आहे. भारतीय जनता पक्षाला नक्की काय झाले आहे? महाराष्ट्रातील त्या पक्षाचे डोके सरकले आहे का? असे अनेक प्रश्न मऱहाटी जनतेला पडत आहेत, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी खुले झाले. मात्र हे सर्व श्रेय आमचेच, असा गोंधळ सुरू करून भाजपतील ‘उपऱयां’नी विजयोत्सव साजरा केला आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या ठिकाणी हे उपरे वाजतगाजत, गुलाल उधळत आणि नारे वगैरे लावत पोहोचले. एका वृत्तवाहिनीचा ‘भुंकरा’ अँकर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा, ज्येष्ठ नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करतो. त्या ‘भुंकऱ्या’स सोडविण्यासाठी पवित्र न्यायमंदिरांचा ‘बाजार’ करणाऱ्यांना मंदिरे उघडल्याचे श्रेय लाटायचे आहे. अशा लोकांविषयी काय लिहायचे व काय बोलायचे? 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख