जव्हार : राज्यातील अघोरी जादूटोणा नरबळींचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सरकारने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम २०१३ अंमलात आणला, मात्र अजूनही अघोरी जादूटोणा नरबळी प्रथा केल्या जातात.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी याच अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. जादूटोणा करणाऱ्यांना पालघर उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलिस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून अटक केली आहे.
विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा, अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होऊन दुखापत करण्यासाठी अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांचा पक्षाच्या विरोधातच प्रचार; माजी आमदाराचा गौप्यस्फोट #Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #SujitMinchekar #ShivSena #UddhavThackeray #Kolhapur #ViralNewshttps://t.co/2eOmFQ9SOq
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 16, 2020
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसमोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे. कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर जव्हार पोलिस स्टेशनमध्ये फसवणूक व महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अघोरी जादूटोणा करणाऱ्या सूत्रधारांचा अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा : मुकेश अंबानींच्या कार्यालयावर राजू शेट्टी काढणार मोर्चा..
पुणे : देशातील काही बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठीच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नवे कृषी कायदे केले आहेत. या कायद्यांचा लाभ शेतकऱ्यांना नव्हे तर मुकेश अंबानी यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतींना होणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला. केंद्र सरकारच्या या कायद्यांना विरोध करण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर येत्या २२ डिसेंबर रोजी धडक मोर्चा काढणार असल्याचे शेट्टी यांनी यावेळी जाहीर केले. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

