Thackeray's government can go and BJP government can come... | Sarkarnama

#SachinPailot:पायलट यांच्या निर्णयाचे स्वागत...महाराष्ट्रातही सत्तांतर घडेल....?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जुलै 2020

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन भाजपचे सरकार येऊ शकते, अशी शक्यता रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई :  काँग्रेस सोडण्याचा सचिन पायलट यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे.   त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत. राजस्थानच्या विकासासाठी सचिन पायलट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीर उभे राहावे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन भाजपचे सरकार येऊ शकते, अशी शक्यता रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

राजस्थान मध्ये बहुमतासाठी 101 आमदारांची गरज आहे. सचिन पायलट यांनी त्यांना 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यांनी जर 30 आमदारांचा पाठिंबा मिळविला तर भाजपकडे 78 आमदारांचे संख्याबळ असून सचिन पायलट यांच्या 30 आमदारांमुळे भाजप 108 आमदारांच्या बळावर राजस्थानात भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते. जसे माध्यप्रदेश मध्ये काँग्रेसच्या कामलनाथ यांचे  सरकार जाऊन भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांचे  सरकार आले.

राजस्थानात काँग्रेसचे सरकार जाऊन भाजप चे सरकार येईल। राजस्थान नंतर महाराष्ट्रात ही सत्तांतर घडेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन महाराष्ट्रात भाजप चे सरकार येऊ शकते अशी शक्यता रामदास आठवले यांनी व्यक्त केली.सचिन पायलट यांचा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये सन्मान होत नव्हता. अपमान होत असल्याने सचिन पायलट यांनी योग्य निर्णय घेतला आहे असेआठवले म्हणाले. 

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांची मंगळवारी (ता. 14 जुलै) उपमुख्यमंत्री, तसेच प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. पायलट यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासारा यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. गोविंद सिंह हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय मानले जातात. राजस्थानातील कॉंग्रेसच्या बहुसंख्य आमदारांच्या मागणीनुसार पायलट यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केली. 

राहुल गांधी यांची यंग ब्रिगेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी एक-एक मोहरा गळू लागला आहे. याची सुरूवात मध्य प्रदेशातून झाली. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. त्यानंतर पुन्हा भाजपचे सरकार येऊन शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते.

याचबरोबर शिंदे यांनी राज्यसभा सदस्यत्व मिळाले होते. आता यंग ब्रिगेडमधील सचिन पायलट यांनी बंड केले. त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता. मात्र, अशोक गेहलोत यांनी पायलट यांचे बंड हाणून पाडले. अखेर पायलट यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी होण्यासोबत उपमुख्यमंत्रिपदही काढून घेण्यात आले. पायलट बंड अखेर फसले असून, गेहलोत यांनी राज्यावरील पकड पुन्हा घट्ट केली आहे. याचबरोबर पायलट समर्थक दोन मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. 
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख