ठाकरे सरकार सप्टेंबर अखेरपर्यंत पडणार : नारायण राणे 

राज्यातील उद्धव ठाकरे यांचे सरकार सर्वच मुद्‌द्‌यांवर अपयशी ठरले आहे. महाविकास आघाडीत कोणताही ताळमेळ नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर अखेरपर्यंत हे सरकार कोसळेल, असे भाकीत माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी पुन्हा केले.
Thackeray government to fall by end of September: Narayan Rane
Thackeray government to fall by end of September: Narayan Rane

मालवण (जि. सिंधुदुर्ग) : राज्यातील उद्धव ठाकरे यांचे सरकार सर्वच मुद्‌द्‌यांवर अपयशी ठरले आहे. महाविकास आघाडीत कोणताही ताळमेळ नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर अखेरपर्यंत हे सरकार कोसळेल, असे भाकीत माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी पुन्हा केले. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा मुद्दा मागे पडावा, यासाठीच कर्नाटकात जाऊन आंदोलन करण्याची भाषा शिवसेना करत आहे. मात्र, अशा आंदोलनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोणी आव्हान देण्याची गरज नाही. आम्ही सक्षम आहोत. हिंमत असेल तर खासदार संजय राऊत यांनी आमच्या सोबत यावे, असे आव्हान खासदार राणे यांनी या वेळी दिले. 

नीलरत्न निवासस्थानी नारायण राणे हे पत्रकारांशी संवाद साधत होते. त्या वेळी त्यांनी वरील आरोप केला. या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार नीतेश राणे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार प्रसाद लाड, आमदार भाई गिरकर, आमदार रमेश पाटील, प्रदेश सचिव प्रमोद जठार, अतुल काळसेकर आदी उपस्थित होते. 

दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी या अगोदरही ठाकरे सरकारवर आरोप करत हे महाविकास आघाडीचे सरकार लवकरच कोसळणार असे भाकित वर्तविले होते. मात्र, ते सत्यात येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी नव्याने वर्तविलेले भाकीत खरे ठरते का नाही, हे पाहावे लागणार आहे. 


हेही वाचा : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे संचालक गुलाबराव चव्हाण यांचा भाजपत प्रवेश 

आगामी काळात होऊ घातलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आमदार नीतेश राणे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का दिला आहे. जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक गुलाबराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात गुलाबराव चव्हाण यांचे नाव मोठे आहे. नारायण राणे यांच्या मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी विधान सभेतील विरोधी पक्षनेते फडणवीस, खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 

सहकार महर्षी शिवराम जाधव यांच्यापासून गुलाबराव चव्हाण हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आहेत. तेव्हापासूनच ते जिल्हा बॅंकेच्या संचालक पदावरही काम करीत आहेत. जिल्हा सहकारी बॅंकेच्या सत्तेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हा बॅंकेच्या सत्ताधाऱ्यांना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com