teacher who tried to suicide at MLA hostel is Danave Supporter | Sarkarnama

आमदार निवासात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शिक्षक निघाले दानवेंचे कार्यकर्ते

महेश जगताप
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

शिक्षकांच्या मागण्यांसाठीच्या दिंडीला खैरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने वेगळे वळण लागण्याचा धोका होता. 

मुंबई : शिक्षक म्हणून गेली 15 वर्षे काम करूनही वेतन मिळत नव्हते त्यामुळे  वैतागून आमदार निवासातच आत्महत्या करण्याचा प्रयत्नं करणारे गजानन खैरे हे राज्यभर चर्चेचा विषय ठरले. पण खैरे हे  भाजप नेत्यांच्या जवळचे कार्यकर्ते निघाले आहेत.

भाजप आमदार संतोष दानवे यांच्या आकाशवाणी आमदार निवासाच्या ४०१ या खोलीत ते काही दिवस रहात होते. त्याचबरोबर भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांबरोबर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.

खैरे यांनी बुधवारी (ता. 16 सप्टेंबर) रोजी मुंबईतील आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने अनेक नेते, पोलिस आणि अग्निशामन दलाची धावपळ उडाली होती . उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत आणि इतर आमदार चौथ्या मजल्यावर जाऊन खैरे यांना लेखी आश्वासन दिले. सामंत यांना हा शिक्षक ऐकत नसल्याने समजूत काढण्यासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनाही चौथ्या मजल्यावर जावे लागले होते. गळ्याला ब्लेड लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न खैरे यांनी केला होता . तसेच सोडविण्यासाठी येऊ नका, थेट निर्णय घ्या, असा इशाराही त्यांनी दिला होता .खैरे हे औरंगाबाद येथील रहिवासी आहेत.

 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t1.0-9/p960x960/50810104_392213881552594_1412650434832629760_o.jpg?_nc_cat=109&_nc_sid=7aed08&_nc_ohc=bh-Ptd_nznIAX_y11y7&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&tp=6&oh=fbb2ac7b7c46a3e69ed768b69a590314&oe=5F87B688

 

प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसाठी 20 टक्के, 40 टक्के  वेतन अनुदान सरकारने घोषित केले होते. या वेतन अनुदानाचा शासन निर्णय त्वरित निर्गमित करून शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करावा अशी मागणी खैरे यांनी शिक्षणमंत्री , मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन केली होती . काल सामंत यांनी खैरे यांना लेखी आश्वासन देऊन लवकरच हा प्रश्न सोडवू असे सांगून त्यांची समजूत काढली.

फेसबुकवरील फोटोत खैरे हे  भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतही  कार्यक्रमात स्टेज वर बसलेले दिसत आहेत. त्याचबरोबर विनोद तावडे यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एकत्र दिसत आहेत व भाजपच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असलेले फोटो व्हायरल होत आहेत.

 खैरे यांनी नवयुग क्रांती शिक्षक संघटना स्थापन केली असून विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या मागण्यांसाठी त्यांनी अन्नत्याग पायी दिंडीचे आंदोलन पुकारले होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवास्थानाकडे जात असताना मरिन ड्राईव्ह पोलिस प्रशासनाने सर्व आंदोलक शिक्षकांना ताब्यात घेऊन सर्वांचे मोबाईल तात्पुरत्या स्वरूपात जप्त करून पोलिस स्थानकातच बसवून ठेवले होते. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. त्यानंतर खैरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

वाचा आधीची बातमी- शिक्षकाचा आमदार निवासात आत्महत्येचा प्रयत्न : पटोले, उदय सामंतांची धावपळ 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख