संसद महारत्न पुरस्काराचे 'हे' खासदार ठरले मानकरी...

प्राईम पॉईंट फाउंडेशनचा संसदरत्न पुरस्कार सलग पाच पाच वेळा पटकावणाऱ्या खासदाराला फाउंडेशनतर्फेच संसद महारत्नाने सन्मानित केले जाते.
supriya.jpg
supriya.jpg

पिंपरी : बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची संसद महारत्न पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येत्या २० मार्चला दिल्ली येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. 

संसदेतील कामगिरीसाठी चेन्नईच्या प्राईम पॉईंट फाउंडेशनचा संसदरत्न पुरस्कार सलग पाच पाच वेळा पटकावणाऱ्या खासदाराला फाउंडेशनतर्फेच संसद महारत्नाने सन्मानित केले जाते. 

दरम्यान, संसदेतील उल्लेखनीय कामाबद्दल खासदार बारणे यांचा नुकताच दिल्लीत भारत गौरव पुरस्कार देण्यात आला. 

दिल्लीच्या भारत गौरव अवॉर्ड फाउंडेशनचा हा पुरस्कार केंद्रीय मंत्री मनसुकलाल मांडविया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संसदेत सर्वाधिक प्रश्न मांडणे, संसदेतील सर्वाधिक उपस्थिती आणि सर्वाधिक चर्चांमधील सहभागाबद्दल बारणे यांना तो देण्यात आला. लोकसभेत चांगले काम करणा-या टॉप पाच खासदारांमध्ये बारणे यांचे नाव आहे.

हेही वाचा : शिवप्रेमींच्या रेट्यानंतर नावात बदल...
 
बारामती : राज्यात संभाजी बिडी नावानं वितरीत होणाऱ्या बिडीचं नाव बदलण्यात आले आहे. यापुढे साबळे बिडी नावानं हे उत्पादन बाजारात उपलब्ध होणार आहे. राज्यातल्या तमाम शिवप्रेमींनी केलेल्या आंदोलनानंतर कंपनीने नाव बदलण्याचा निर्णय जाहीर केला होता. विशेष म्हणजे, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शिवधर्म फाउंडेशनकडून या बिडीचं नाव बदलण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणही करण्यात आलं होतं. संभाजी बिडी या नावामुळे छत्रपती संभाजीमहाराज यांचा अवमान होत असल्याचा आक्षेप घेत शिवप्रेमींनी याबद्दल आंदोलन केलं होतं. शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आमरण उपोषणही करण्यात आलं होतं.. त्यानंतर साबळे-वाघिरे कंपनीने या बिडीच्या नावात बदल करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार या बिडीचं साबळे बिडी असं नामकरण करण्यात आले आहे. हा समस्त शिवप्रेमींच्या लढ्याचा विजय असल्याचं शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी सांगितलं.

Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com