बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे... - The struggle of the people of Belgaum is that of Marathi speakers from all over the world  | Politics Marathi News - Sarkarnama

बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

बेळगाववासी यांचा जो लढा आहे, तो संपूर्ण जगामधल्या मराठी भाषिकांचा आहे. जे मानव अधिकारांसाठी लढत आहे. त्या प्रत्येकांच्या लढा आहे या लढ्यांमध्ये आम्ही सहभागी आहोत.

मुंबई : "बेळगाववासी यांचा जो लढा आहे, तो त्यांचा नाही आहे, संपूर्ण जगामधल्या मराठी भाषिकांचा आहे. जे मानव अधिकारांसाठी लढत आहे. त्या प्रत्येकांच्या लढा आहे, या लढ्यांमध्ये आम्ही सहभागी आहोत," असे विधानपरिषदेच्या उपसभापती डाँ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

डाँ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की महाराष्ट्राचा अनेक भाग बेळगाव, निपाणी, कारवा, भालकी, बिदर हा कर्नाटक व्याप्त झालेला भाग आहे. ज्यावेळेला महाराष्ट्राची नवीन निर्मिती झाली आणि त्याच वेळेनंतर अनेक भाग आहेत. त्या सीमाभागावरती सीमावासीय यांना कर्नाटक मध्ये राहणे भाग पडलं अशा पद्धतीने निवाळा केंद्र सरकारने केला. त्यानंतर आज पर्यंत कोर्टामध्ये केसेस चालू आहे.

विधानसभा आणि विधान परिषदमध्ये अनेक वेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर ठराव झालेला आहे. शिवसेनाप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली होती.  फार मोठा संघर्ष संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर केला आहे. या विषयावर शिवसेना सातत्याने संघर्ष करत आलेली आहे. आज बेळगाव मधल्या सीमावासीयांनी काळा दिन पाडण्याचे आवाहन केलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारमधील मंत्री सर्व सहभागी आहेत. विधिमंडळामध्ये आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे लक्ष वेधत असतो. जे-जे हुतात्मे झालेत आणि नम्रतापूर्वक आणि मनःपूर्वक व नम्रतापूर्वक अभिवादन करते." 

"बेळगाववासी यांचा जो लढा आहे, तो संपूर्ण जगामधल्या मराठी भाषिकांचा आहे. जे मानव अधिकारांसाठी लढत आहे. त्या प्रत्येकांच्या लढा आहे या लढ्यांमध्ये आम्ही सहभागी आहोत. महाराष्ट्राचं सर्व आमदार सहभागी आहोत. शिवसेना सहभागी आहे, आणि महाराष्ट्राची जनता ही आहे त्यांचा जो आवाज आहे. ती जनता अमर आहे, मला असं वाटतं जनतेच्या प्रश्नावरच्या हा लढा कुठे ना कुठे न्याय मिळण्यासाठी आपण सगळे एकजुटीने राहू हाच आमचा संकल्प असावा," असे नीलम गोऱ्हे यांनी नमूद केलं. 

हेही वाचा : महाराष्ट्रात मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच सामील होईल : जयंत पाटील

मुंबई  : महाराष्ट्रात आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच सामील होईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मराठी बांधवांच्या समर्थनार्थ काळा दिवस पाळला जातो आहे. आज काळ्या फिती लावून हा निषेध व्यक्त करण्यात आला. जयंत पाटील यांनीही काळी फीत लावून कामकाज केले. कर्नाटकमधील मराठी सीमा वासियांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार व जुलुम याचा निषेध राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काळी फित लावून करत आहेतच शिवाय मंत्रीही निषेध व्यक्त करत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख