मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना धमकी आल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पूजा चव्हाण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीस म्हणाले की पूजा चव्हाण प्रकरणात आमच्या भाजपाच्या आमदारांना कितीही धमक्या दिल्या तरी आम्ही सत्य बोलणं थांबविणार नाही. हे प्रकरण कशा प्रकारे संपवता येईल, याचा प्रयत्न पोलिस आणि सरकारकडून सुरू आहे. या संदर्भातील सर्व ध्वनिफित उपलब्ध आहे, मात्र पोलिसांकडून अद्याप काही कारवाई झालेली नाही. ज्या क्षणी अशा प्रकारचा गुन्हा संबधितांवर दाखल होईल, त्या दिवशी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, मात्र जाणीव पूर्वक राजीनामा घेतला जात नाही.
संजय राठोड दोन दिवसांनी ‘या’ ठिकाणी प्रगटणार...? https://t.co/6rZnU1RA2x #PoojaChavanSuicide #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNews
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 15, 2021
"पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी नियमानुसार चैाकशी होईल. या प्रकरणाचा तपास कोणत्याही राजकीय दबाबाखाली नाही. विरोधी पक्ष जे आरोप करीत आहेत, ते चुकीचे आहेत. विरोधकांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही," असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, पूजाच्या मृत्यूला आठ दिवस झाले आहेत, तरीही अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.
या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात आहे. याबाबत विचारले असता, अनिल देशमुख म्हणाले की संजय राठोड हे कोठे आहेत, मला माहित नाही. तो त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. या प्रकरणाच्या चैाकशीतून लवकरच सत्य बाहेर येईल. पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की माझ्या मुलीची बदनामी मीडियाने थांबवावी. तिनं आर्थिक विवेंचनेतून आत्महत्या केली, असे म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. सोशल मीडियामध्ये व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील आवाजही पूजाचा नसल्याचं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं आहे.
मिटकरी म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे की या प्रकरणाची पूर्ण चैाकशी झाल्यानंतर सिद्ध होईल की वनमंत्र्यांचा संबध आहे की नाही, हे स्पष्ट होईल. जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मी देखील राज्य सरकारच्या शक्ती कायदा समितीवर आहे. जर कोणी या गैरवापर करून एखाद्याला असे बदनाम करून करिअर उद्धस्त करीत असेल तर खपून घेतले जाणार नाही. आँडिओ क्लिप बनावट सुद्धा असू शकते. पूर्ण सत्यता बाहेर आल्याशिवाय कोणीही कुठल्याही निकषापर्यंत जाऊ नये, असे मला वाटतं.
पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरूणीचा आठ दिवसापूर्वी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.

