उच्च शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना उस्मानाबादी `धडा` - state minister Prajakta tanpure gets lesson in osmanabad | Politics Marathi News - Sarkarnama

उच्च शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना उस्मानाबादी `धडा`

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

पत्रकाराच आज विविध ठिकाणी बातमीचा विषय झाले...

उस्मानाबाद : मुंबईतील पत्रकारांना अपशब्द वापरणाऱ्या रिपब्लिक टिव्हीच्या एका बातमीदाराला मार बसल्याची घटना ताजी असतानाच पत्रकारांच्या दुसऱ्या बातमीने लक्ष वेधले गेले आहे. त्याचा फटका उच्च शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना बसला आहे. 

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उस्मानाबाद जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने उस्मानाबाद शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयाने देखील पञक काढले. मात्र तीन वेळा वेळ आणि स्थळ बदलले. त्याचबरोबर आयोजित करण्यात आलेल्या वेळेस पञकार परिषद घेण्याचे सोडुन पत्रकारांना तब्बल एक तास बसवुन मंञी महोदय कार्यकर्त्यांचे हारतुरे स्वीकारत बसल्याने पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या उस्मानाबादच्या पत्रकारांनी परिषदेवर बहिष्कार टाकला. वेळेवर पत्रकार परिषद सुरू न करण्याची अनेक नेत्यांची सवय असते. त्यामुळे अशा नेत्यांना उस्मानाबादच्या पत्रकारांनी धडा शिकवला.

मुंबईत काय घडले?

मुंबईत रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं आपल्याला एनडीटीव्ही व एबीपीच्या पत्रकारांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. रिपब्लिकचे पत्रकार प्रदीप भंडारी यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. भंडारी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्य बोलण्याची काय किंमत आहे हे बघा असं सांगत एनडिटिव्ही व एबीपीच्या गुंड पत्रकारांनी आपल्याला मारहाण केल्याचं म्हटलं आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये प्रदीप भंडारी यांना इतर पत्रकारांकडून धक्काबुक्की होताना दिसत आहे. प्रदीप भंडारी यांनी ट्विट करत एनडीटीव्ही आणि एबीपीच्या पत्रकारांचा गुंड असा उल्लेख केला आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख