गडचिरोलीत दारूबंदी कायम, राज्य सरकारची जिल्ह्यातील जनतेला ग्वाही

चंद्रपूरपाठोपाठ शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी समिती स्थापनेचा मनोदय मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
गडचिरोलीत दारूबंदी कायम, राज्य सरकारची जिल्ह्यातील जनतेला ग्वाही
darubandi.jpg

गडचिरोली : ‘‘सरकारचा दारूबंदी उठविण्याचा आदेश केवळ चंद्रपूर जिल्ह्यापुरता मर्यादित असून, गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम आहे. शिवाय गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याबाबत सरकारी पातळीवर कोणतीही कार्यवाही सुरू नाही, अथवा प्रस्तावित नाही,’’ असे स्पष्टीकरण राज्याच्या प्रधान गृहसचिव वल्सा नायर-सिंह यांनी केले आहे. (State government testifies to people in Gadchiroli)

चंद्रपूरपाठोपाठ शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासाठी समिती स्थापनेचा मनोदय मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा दारूमुक्ती संघटना व मुक्तीपथ यांच्या वतीने डॉ. अभय बंग यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते.

गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी यशस्वी असून ती कायम ठेवावी अशी अकराशे गावातील लोकांच्या निवेदनांसह पाठविलेल्या या पत्राला सरकारतर्फे वल्सा नायर-सिंह यांनी उत्तर देत गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम राहील, अशी ग्वाही दिली.

दारूबंदी यशस्वी कशी करावी याचे जिल्हाव्यापी प्रारूपच गडचिरोली जिल्ह्यातून उभे राहिले. असे असताना मंत्र्यांनी दारूबंदी विषयी साशंकता निर्माण करणारे निवेदन केल्यामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या अस्वस्थतेला व असंतोषाला महाराष्ट्र शासनाने ‘दारूबंदी कायम ठेवण्याचे आश्वासन द्यावे’ असे आवाहन जिल्हा दारूबंदी संघटनेतर्फे अध्यक्ष डॉ. अभय बंग यांनी केले होते. सरकारने त्याला योग्य प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, या दारुबंदीविषयी महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे.

हेही वाचा..

तपोवन रस्त्यावरील भीषण आगीत सात गाळे खाक

नगर : तपोवन रस्त्यावरील सात गाळेना शनिवारी दुपारी भीषण आग लागून सात गाळे पूर्णपणे खाक झाले. या वेळी या ठिकाणची पाहणी महापौर रोहिणी शेडगे यानबी केली. या वेळी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, शाम नळकांडे,संजय शेडगे आदी उपस्थित होते.

या वेळी अनेकांना आपले अश्रू अनावर झाले होते. आपल्या डोळ्या देखत सर्वकाही जुळून खाक झाले. या वेळी महापौर रोहिणी शेडगे व शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी त्यांना आधार देत सर्व काही पुन्हा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले, तसेच याvवेळी अग्निशमन विभागाने तत्परता दाखवत वेळीच या ठिकाणी धाव घेतली, त्याबद्दल त्यांचे कोतुक केले.

तोफखाना पोलीस निरीक्षक जोती गडकरी यांचेशी सुद्धा महापौर यांनी चर्चा केली, आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे येथील दुकानदार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in