भाजपच्या खासदारांकडून राज्य सरकारची पाठराखण 

राज्य सरकारने लॉकडाउन उठवून राज्यातील नागरिकांचे मनोबल वाढवावे, असेही आवाहन शेट्टी यांनी केले आहे.
collage (9).jpg
collage (9).jpg

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येसंदर्भात भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी सरकारवर टीका न करता त्यांची पाठराखण केली आहे. चाचण्यांची संख्या वाढत असल्याने आता रुग्णसंख्या वाढलेली दिसते आहे. तरीही अशा स्थितीत राज्य सरकारने लॉकडाउन उठवावा, असेही त्यांनी म्हटले आहे. 

चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णसंख्याही वाढली आहे. मात्र, आपण फार काळ असेच घरात बसून राहून चालणार नाही, जगात कोठेही कोरोना रुग्णांची संख्या शून्य होणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या नियमांनुसार राज्य सरकारने लॉकडाउन उठवून राज्यातील नागरिकांचे मनोबल वाढवावे, असेही आवाहन शेट्टी यांनी केले आहे. 

सर्वांनी अथक प्रयत्न करूनही रुग्णसंख्या वाढतेच आहे, त्यामुळे आता सामूहिक रोगप्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण होणे हाच त्यावर उपाय दिसतो आहे. त्यासाठी आता सरकारी यंत्रणेने हिमतीने बाहेर पडणे आवश्यक आहे. कारण आता इतके दिवस लॉकडाउन पाळून एक शिस्त-व्यवस्था निर्माण झाली आहे. 

घरात बसून लोकांनाही नेमके काय करावे हे कळले आहे, हजारो लोक तर होम क्वारंटाईन होऊनच बरे झाले आहेत. कोरोनाचा एकही रोगी शिल्लक राहणार नाही, अशी अवस्था जगात कोठेही केव्हाही येणार नाही. त्यामुळे आता लोकांना फार काळ घरात डांबून न ठेवता सरकारने आपले काम केले पाहिजे. 

यासंदर्भात शेट्टी यांनी समाजमाध्यमांवर व्हिडियो प्रसिद्ध करून राज्य सरकारला वरील आवाहन केले आहे. आपण या विषयावर राज्य सरकारवर टीका करीत नाही. उलट सर्वांनीच सरकारचे नियम पाळले पाहिजेत. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण सर्व नागरिकांनी तसेच सरकारनेही प्रयत्न केले पाहिजेत. हे सर्वांचेच काम आहे. मात्र, सरकारने आतापर्यंत बांधलेले आपले हातपाय त्यासाठी सोडणे आवश्यक आहे. त्यामुळे आता लॉकडाउन पूर्णपणे उठवण्याची प्रक्रिया सरकारने सुरु करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : मराठा आरक्षणाबाबत आज ठरणार रणनिती.. 
मुंबई : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या नेतृत्त्वाखालील घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय न्यायूमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने काल दिला.सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर निर्माण झालेली परिस्थिती व पुढील रणनितीवर चर्चा करण्यासाठी आज सायंकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ बंगल्यावर मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार तसेच राज्याचे महाधिवक्ता, राज्य सरकारचे वकिल व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com