राज्य सरकारने बागायतदारांची थट्टा केली...

राज्य सरकारने बागायतदारांची थट्टा केली आहे. एवढे कमी अनुदान आम्ही घेणार नाही." असे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील 'सरकारनामा' शी बोलताना म्हणाले.
3jayant_patil_shekapa.jpg
3jayant_patil_shekapa.jpg

पुणे "वादळाने नुकसान झालेल्या बागायतदारांना राज्यसरकारने झाडनिहाय केवळ अडीचशे रुपये अनुदान देऊन राज्य सरकारने बागायतदारांची थट्टा केली आहे. एवढे कमी अनुदान आम्ही घेणार नाही." असे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील 'सरकारनामा' शी बोलताना म्हणाले.

 काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे कोकणात नारळ आणि सुपारी बागांचे मोठे नुकसान झाले होते. या बागांची पाहणी करायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले होते. त्यांनी या बागायतदारांना मदत करणार, असे आश्वासन दिले होते तर विरोधकांनी 'बागायतदारांना मदत करा' अशी मागणी केली होती. त्या वेळेला सरकार मदत मिळावी, अशी अपेक्षा लोकांनी व्यक्त केली होती .आणि सगळ्या बागायतदारांचे लक्ष सरकारच्या मदतीच्या दिशेने होते. सरकारने अनुदान जाहीर केले, त्यावर शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

ते म्हणाले, "नारळाच्या झाडाला अवघे अडीचशे रुपये अनुदान दिले आहे तर सुपारीच्या झाडाला 50 रुपये अनुदान दिले आहे हे अनुदान अतिशय कमी आहे.  एक नारळ पंधरा रुपयाचा असतो. आणि एक झाड किमान पंधरा वर्षे फळ देते. या सगळ्या बाबी विचारात घेऊन सरकारने अनुदान द्यावे. शिवाय घराच्या समोरील जी झाड होती त्याचाही विचार केला पाहिजे." "नारळ आणि सुपारी ही कोकणातील लोकांच्या संसाराला मदत करणारी झाड आहेत. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावर असतो. झाडांचे नुकसान झाल्याने लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि सरकार प्रत्येक झाडाला अडीचशे रुपये देत आहे. ही लोकांची थट्टा आहे. आम्ही एवढे कमी पैसे घेणार नाही," असे आमदार पाटील म्हणाले.

Edited by : Mangesh Mahale


हेही वाचा  :  जयंत पाटील हरवले इगतपुरीच्या धबधबे अन् धरणांच्या बॅकवॅाटरमध्ये
 
नाशिक : महाबळेश्वरनंतर राज्यातील सर्वाधिक पाऊस इगतपुरीला होतो. त्यामुळे सध्याच्या हंगामात इथे पावलोपावली बहरलेली हिरवीगार भातशेती, सह्याद्रीच्या शिखरावरून कोसळणारे धबधबे आणि जाल तिकडे धरणांचे बॅकवॅाटर असे मनोहारी दृष्य असते. यात रमणार नाही असा माणुस शोधुनही सापडणार नाही. जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे देखील हे दृष्य पाहून हरखून अन् हरवून गेले. जलसंपदामंत्री जयंत पाटील राष्ट्रवादी कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे सतत मागणी करणारे, हार-तुरे देऊन स्वागत करणारे यांच्याच गराड्यात त्यांना वावरावे लागते. यातून सुटलेच तर मंत्री म्हणून अधिका-यांचा गराडा पडतो. यातून उसंत नसते. मात्र शनिवारी त्यांना या सगळ्यांचाच विसर पडला. निमित्त ठरले, महाराष्ट्राची चेरापुंजी असलेल्या इगतपुरीचा दौरा. त्यांनी मस्त अर्धा दिवस येथे घालवला.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com