Some call it champa..some call it dog .. | Sarkarnama

"कुणी चंपा म्हणतं..तर कुणी कुत्रा म्हणतं...."

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 जुलै 2020

कुणी चंपा म्हणतं..तर कुणी कुत्रा म्हणतं..अशी विधाने खपवून घेतली जाणार नाही.  भाजप नेत्यावर केलेल्या अशा विधानांना उत्तर देण्यासाठी भाजपला आक्रमक व्हावे लागेल," असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केले.

मुंबई : "कुणी चंपा म्हणतं..तर कुणी कुत्रा म्हणतं..अशी विधाने खपवून घेतली जाणार नाही.  भाजप नेत्यावर केलेल्या अशा विधानांना उत्तर देण्यासाठी भाजपला आक्रमक व्हावे लागेल," असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केले. महाराष्ट्र भाजपच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकडे ही खंत व्यक्त केली. 

भारतीय जनता पक्षाने ता. ३ जुलै रोजी जाहीर केलेल्या नवीन कार्यकारीणीची पहिलीच बैठक जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाली.  दिल्ली येथून जे. पी. नड्डा हे बैठकीत सहभागी झाले होते. तर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईत नसलेले सर्व नेतेही या बैठकीला उपस्थित होते.  

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले,  "राज्यात कोरोनाच्या काळात भाजपकडून विविध  मदत केली जात आहे. कोरोना तपासणी केंद्र, क्वांरटाइन सेंटर यांची संख्या वाढवायची आहे. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी आहे. भाजपने आंदोलन केल्याने  सरकारला अधिवेशनात २ लाखांपर्यंत कर्ज माफीची घोषणा करावी लागली. कोरोनाबाबत झालेल्या भ्रष्टाचाराला बाहेर काढण्यासाठी भाजपला रस्त्यावर आंदोलन करावे लागणार आहे. "

जे. पी. नड्डा म्हणाले, "आपल्या फायद्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील सरकार काही करत नाही , भ्रष्टाचार सुरू आहे , मुख्यमंत्र्यासह सगळे तेच करत आहेत . या सगळ्यांना जनतेसमोर आणलं पाहिजे.  शेमलेस पद्धतीने चालणाऱ्या या सरकारला तुम्ही चांगलं एक्सपोज करताहेत.  केंद्र सरकारच्या आचिवमेंट्सची माहिती लोकांना पाठवा.  राज्य सरकार किती कमकुवत आहे ते दाखवा , लोकांपर्यंत पोहचवा. आय़टी सेल काम राज्यात कमी पडत आहेत. त्यासाठी ग्रुप तयार करा. त्या ग्रुपवर केंद्र सरकार राबवित असलेल्या योजना विषयी माहिती पाठवा. आपल्या बूथ कार्यकर्त्यांना राजनैतिक कार्यकर्ता म्हणून तयार करा"

कोरोनाच्या राज्यातील परिस्थितीचा आढावा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच झालेला दिल्ली दैारा, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर केलेली टिका, सरकार पाडून दाखविण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आव्हान  या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली.  

Edited by : Mangesh Mahale

हेही वाचा  :या सरकारच स्टेरिंग अजितदादांच्या हाती : विनायक मेटे 

पुणे : राज्याला एक मुख्यमंत्री नाही तर 3 मुख्यमंत्री आहेत .उद्धव ठाकरे हे व्हीसीद्वारे बैठका घेत आहेत. अजित पवार मंत्रालयात येऊन बैठका घेतात तर सुप्रीम मुख्यमंत्री हे शरद पवार आहेत.आणि हे सरकार 3 पक्षांचा नसून 2 पक्षाचा असल्याचं सांगत आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे .ते काल मुलाखतीमध्ये बोले होते ही मी 3 चाकी सरकारच स्टेरिंग हातात घेऊन चालवत आहे. मात्र, आज अजित पवार यांनी जे फोटो टाकून ट्विट केलं त्यात 4 चाकी गाडीच स्टेरिंग दादांच्या हातात आहे. यावरून समजत की सरकार कोण चालवत आहे .काँग्रेस तर कुठं दिसत नाही  त्याच्या जाहिराती वर काँग्रेस कुठं दिसत नाही, अस सांगत मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख