जनतेला तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर गुन्हे दाखल करा: पालकमंत्री भरणे

यावेळी आपला जीव धोक्यात घालून ग्रामीण भागात विना मोबदला ६२५ कोविड वोरियर्स काम करतात, त्यांचा पालकमंत्री श्री भरणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
 solapur gaurdian minister dattatrey bhrane revived corona situation in akkalkot taluka
solapur gaurdian minister dattatrey bhrane revived corona situation in akkalkot taluka

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रूग्ण कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी हातात हात घालून काम करण्याचे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

अक्कलकोट येथे कोरोना उपाययोजना बाबत आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. बैठकीला आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सभापती सुनंदा गायकवाड, नगराध्यक्ष शोभा खेडगी, प्रांताधिकारी ज्योती पाटील,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, तहसीलदार अंजली मरोड, गट विकास अधिकारी महादेव कोळी आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती पाटील यांनी कोरोना रुग्णांची माहिती दिली.  तालुक्यात २८ रूग्ण असून यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. ९ रूग्ण बरे होऊन घरी गेले तर १५ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

श्री. भरणे यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. ते म्हणाले, अक्कलकोट शहरातील रूग्ण संख्या कमी करण्यासाठी पंढरपूर पॅटर्नची माहिती घ्या. त्याची अंमलबजावणी करा. स्वॅब घेतलेल्या रुग्णांना होम क्वारंटाइन किंवा संस्थात्मक क्वारंटाइन करा. जेणेकरून संसर्ग वाढणार नाही. खासगी दवाखान्यात गेलेल्या रुग्णांची माहिती दवाखान्याच्या डॉक्टरांनी द्यायला हवी. 

कोरोनाशी लढा देण्यासाठी जनतेचे सहकार्य महत्वाचे आहे, काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्या. कोणावरही टीका करू नका. अक्कलकोट शहरात कोविड हॉस्पिटलच्या उभारणीसाठी निधी कमी पडणार नाही. साध्या रुग्णांवर इथेच उपचार होतील, अशी सोय करा तर गंभीर रूग्ण सोलापूरला पाठवा, अशा सूचना श्री भरणे यांनी दिल्या. 

जनतेला तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

कोरोना काळात दुरधनी आणि मैदर्गी नगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षण करण्यासाठी करार पध्दतीने आरोग्यसेविका घेण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी जिल्ह्यात गंभीर रुग्णांवर सोलापुरात चांगले उपचार होत असल्याचे सांगितले. बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची कमतरता नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक श्री पाटील यांनी सोलापूरला जाणाऱ्या नागरिक आणि रुग्णांवर ग्राम समितीच्या मार्फत लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या. कर्नाटक सीमा पूर्णपणे बंद करू, असेही ते म्हणाले.  यावेळी अक्कलकोटमध्ये डायलिसिस हॉस्पिटल, अक्कलकोट- सोलापूर मार्ग काही दिवस पूर्ण बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. 

यावेळी आपला जीव धोक्यात घालून ग्रामीण भागात विना मोबदला ६२५ कोविड वोरियर्स काम करतात, त्यांचा पालकमंत्री श्री भरणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 

कोरोना योद्धा म्हणून तहसीलदार अंजली मरोड, मुख्याधिकारी आशा राऊत, पोलीस उपअधीक्षक संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विन करजखेड, पत्रकार अशपाक मुल्ला, पोलीस नाईक धनराज शिंदे यांचाही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com