... so Ajit Dad was also ready to sit down
... so Ajit Dad was also ready to sit down

...तर अजितदादांनीही खाली बसायची तयारी ठेवली होती 

छत्रपती खासदार संभाजी राजेंना सारथीच्या बैठकीला पोहोचायला उशीर झाला. ते आले आणि त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना वर बसवा, असा सूर लावला. जास्तच दंगा सुरू केल्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार स्वतः उठले आणि राजेंना सन्मानाने त्यांच्या खुर्चीत बसण्याची विनंती केली. पण, काही लोकांना स्टंट करायचा होता. संभाजीराजे त्यांना समजावत होते; पण ते कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

पुणे : "छत्रपती खासदार संभाजी राजेंना सारथीच्या बैठकीला पोहोचायला उशीर झाला. ते आले आणि त्यांच्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना वर बसवा, असा सूर लावला. जास्तच दंगा सुरू केल्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार स्वतः उठले आणि राजेंना सन्मानाने त्यांच्या खुर्चीत बसण्याची विनंती केली. पण, काही लोकांना स्टंट करायचा होता. संभाजीराजे त्यांना समजावत होते; पण ते कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते,' अशी माहिती या बैठकीला उपस्थित असलेले निमंत्रित सदस्य निखिल कदम यांनी दिली. 

सारथी बाबत मुंबईत बोलावलेल्या बैठकीतला वृत्तांत निखिल कदम यांनी सांगितला आहे. याबाबतची माहिती कदम यांनी त्यांच्या फेसबुकवरही पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की "गुरुवारी (ता. 9 जुलै) सकाळी अकराला मीटिंग सुरु करायची होती. अजितदादा बरोबर अकराला आले. त्यांनी पंधरा मिनिटे वाट पाहून सव्वा अकराला मीटिंग सुरू केली. अगोदर आलेल्यांपैकी आमदार विनायक मेटे, विनोद पाटील व इतर चारजण पहिल्या रांगेत बसले. त्यांच्यामागे म्हणजेच तिसऱ्या रांगेत मी बसलो. 

दादा म्हणाले, "बरेच जण अजून आलेले दिसत नाहीत. अकराची वेळ होती, आता सव्वा अकरा होत आहेत. मग दादांनी मिटिंग सुरू केली. विनायक मेटे यांच्या निवेदनावर चर्चा झाली, त्यानंतर दादांनी विनोद पाटील यांना बोलण्याची संधी दिली. ते बोलत असतानाच संभाजीराजे कार्यकर्त्यांसह हॉलमध्ये आले. संभाजीराजेंनी सभागृहात नजर टाकताच आसन व्यवस्था त्यांच्या लक्षात आली आणि ते तिसऱ्या रांगेत अगदी माझ्या बाजूलाच असलेल्या रिकाम्या खुर्चीवर येऊन बसले. हे बघताच विनायक मेटे व विनोद पाटील यांनी उठून राजेंना त्यांच्या जागेवर पुढे येऊन बसण्याची विनंती केली. त्यावर राजेंनी नकार दिला.

त्यानंतर राजेंच्या एक दोन कार्यकर्त्यांनी "त्यांना स्टेजवर बसण्यास जागा द्यावी. तुम्ही राजेंना खाली कसं बसवू शकता? ते छत्रपती आहेत, त्यांचा अपमान करू नका' म्हणायला सुरुवात केली. त्यावर तत्काळ राजेंनी उठून सांगितलं की, "मी छत्रपती म्हणून आलो नाही. मी मराठा समाजाचा सेवक म्हणून आलोय, आपण मिटिंगला आलोयत, मी इथे बसतो काही अडचण नाही,' असे सांगूनही कार्यकर्ते ऐकत नव्हते. 

तेवढ्यात अजितदादा कार्यकर्त्यांना म्हणाले, "तुम्ही प्रश्न सोडायला आलात की वाढवायला? हे बघा संभाजीराजे, मी मिटिंग तुम्ही, विनोद, विनायकराव, राजेंद्र आणि दुसरे दोघे तिघे एवढ्याच लोकांची घेणार होतो आणि तिथं टेबलवर आमनेसामने बसणार होतो. परंतु तुम्हीच म्हणालात माझ्यासोबत 8-10 माणसं येतील; म्हणून मला या हॉलमध्ये मिटिंग घ्यावी लागत आहे. इथं सोशल डिस्टन्सने बसवलंय सगळ्यांना. इथं आपण प्रश्न सोडवायला आलोत आणि मला सांगा राजे संसदेत कुठं बसतात?' त्यावर कार्यकर्ते म्हणाले,"ते सभागृह आहे.' मग दादा म्हणाले,"हे सभागृह नाहीतर काय आहे? आणि सारखं समाज समाज काय लावलंय आम्ही काय आभाळातून पडलोय का? असा सवाल त्यांनी विचारला. त्यानंतर अजितदादा संभाजीराजेंना म्हणाले,"संभाजीराजे तुम्ही एक काम करा, तुम्ही इथं येऊन बसा आणि मी खाली बसतो.' 

त्यावर राजेंनी सांगितलं की,"पवार साहेब नाही नाही तुम्ही तिथेच बसा आणि मी इथं बसतो. मी इथं खासदार म्हणून आलो नाही आणि छत्रपती हा जनतेचा सेवकच असतो आणि मला इथं बसू द्या, मी व्यवस्थित आहे' असं कार्यकर्त्यांना सांगितलं. 

"तेवढ्यात विजय वडेट्टीवार यांनी आपली खुर्ची सोडली आणि राजेंना वर बसण्याची विनंती केली. पण ते बसले नाहीत, त्यानंतर त्यांना दादांनी विनंती केली,"राजे वर येऊन बसा. आमच्या मंत्र्यांनी जागा दिली आहे, तुम्हाला.' तरीही संभाजीराजे वर बसले नाहीत, मात्र वडेट्टीवार नंतर खालीच बसले आणि मिटिंग सुरू झाली,' असे निखिल कदम यांनी म्हटले आहे. 

Edited By  : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com