महाराष्ट्रातून श्रमिक ट्रेनद्वारे लाखो मजूर पोचले मूळ राज्यात

लॉकडाउनमुळे महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परराज्यातील जवळपास ५ लाख २० हजार कामगारांची पाठवणी विशेष श्रमिक ट्रेनद्वारे त्यांच्या मूळ राज्यात करण्यात आली असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
sixty more trains for migrant workers
sixty more trains for migrant workers

पुणे : महाराष्ट्रातून परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मंगळवारी 325 रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. आज आणखी साठ गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्यांतून पाच लाख मजूर आपआपल्या घरी परतणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. प्रशासनाकडून कॉल येईल त्याच कामगारांनी सांगेल त्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.  

देशमुख म्हणाले, "मुंबईत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर आहेत. या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी काल 325 रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या. आज आणखी साठ गाड्या सोडण्यात आल्या. या सर्व गाड्यांतून पाच लाख मजूर घरी जात आहेत. या मजुरांना तिकीट काढण्याची आवश्यकता नसून, त्यांचा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे." 

"महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात 187 गाड्या, बिहारमध्ये 44 , राजस्थानात 13, मध्य प्रदेशात 30 गाड्या सोडण्यात आल्या. बंगालसाठीही आम्ही गाडी सोडण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रशासनाचा कॉल येईल त्याच कामगारांनीच घराच्या बाहेर पडावे. गर्दी करू नये," असे त्यांनी नमूद केले.

"मुंबईत 96 पोलीस ठाणी आहेत. सध्या पोलिसांवर खूप ताण आहे.त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी मंत्रालयातील 1 हजार 500 कर्मचारी त्यांच्या सोबतीला असतील. ज्यांचे वय चाळीसच्या खाली आहे. ते आता पोलिसांसोबत काम करतील,"असे त्यांनी सांगितले. 

विकासकामांवर परिणाम 

देशात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजूर, कामगारांना गावी परतण्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू केली खरी, परंतु, त्याचा फटका विकास प्रकल्पांना बसला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आदी ठिकाणांहून हे मजूर आलेले होते. लॉकडाउनच्या काळात हे मजूर थांबलेले होते. परंतु, श्रमिक ट्रेन सुरू झाल्याने मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत. यामुळे राज्यात सुरू असलेल्या विकासकामांवर परिणाम होत आहे. 

कोरोनाशी निगडित तब्बल लाखाहून अधिक गुन्हे 

राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ११ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २४४ घटना घडल्या. त्यात ८२३व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.  राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १९मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,११,४१२ गुन्हे नोंद झाले असून २२,४९२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ४ कोटी ५६ लाख ५१ हजार १०४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com