sindhudurg guardian minister uday samant about kokan ganpati festival
sindhudurg guardian minister uday samant about kokan ganpati festival

कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही : उदय सामंत

चाकरमान्यांना कोकणात येण्यास विरोध नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.

पुणे: कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही, असे स्पष्टीकरण सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले. सिंधुदुर्गच्या शांतता बैठकीत ते बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोकणात गणपती उत्सवासाठी येणाऱ्या लोकांना प्रतिबंध करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू होता. या निर्णयाला विरोध होत असताना पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण करून लोकांच्या मनातील शंका दूर केली आहे. शांतता बैठकीनंतर बोलताना उदय सामंत म्हणाले,  गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही. त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध आहे. येणाऱ्या चाकरमान्यांना विलगीकरण कक्षात चौदा दिवस ठेवण्यापेक्षा सात दिवस ठेवणे, त्यांना येताना टोल माफ करणे, त्यांच्या पासेसची व्यवस्था करणे, तसेच त्यांची कोविड-19 ची तपासणी करणे आणि त्याचा खर्च शासनाने करणे अशा विविध विषयांवर सविस्तर बैठकीत चर्चा करण्यात आली. कोकणात येणाऱ्या सर्व चाकरमान्यांची विशेष काळजी घेण्यात येईल. चाकरमान्यांनी गणपतीला आलेच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे, असे सामंत म्हणाले.

मुंबईत शिवसेनेची शाखा तिथे दवाखाना; जैनमंदिरातही कोरोना उपचार केंद्र !

मुंबई: कोरोनाचे भीषण संकट परतवण्यासाठी कोणतेही प्रयत्न शिल्लक ठेवायचे नाहीत असा निर्धार मुंबईकरांनी केला आहे. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, नगरसेविका रिद्धी खुरसंगे, नगरसेवक संजय घाडी आदींच्या प्रयत्नांनी शिवसेना शाखांचे रुपांतर तात्पुरत्या उपचार केंद्रात होत आहे. 

सध्याच्या टाळेबंदीमुळे प्रार्थनास्थळे, शिवसेना शाखा येथे नेहमीप्रमाणे लोकांची गर्दी नाही. त्यामुळेच या रिकाम्या जागांचे रुपांतर कोरोना रुग्णांसाठी करण्याची कल्पना समोर आली. त्यानुसार मागठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे वसौ. खुरसंगे, श्री. घाडी यांनी मागठाणे येथील सहा शिवसेना शाखांचे रुपांतर दवाखान्यात केले आहे. येथे प्रशांत रानडे यांच्यासह अन्य तज्ञ डॉक्टर तैनात आहेत. ते कोरोना रुग्णांसह अन्य रुग्णांवरही औषधोपचार व प्राथमिक तपासणी करतात. येथे गरज असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. येथील डॉक्टर, कर्मचारी, सहायक आदी सर्वांना पीपीई किट देण्यात आले आहेत. या दवाखान्यांचे सतत निर्जंतुकीकरणही केलेजाते. कोरोना रुग्ण किंवा अन्य रुग्णांना दवाखान्यात जागा मिळेपर्यंत जरुर तर या तात्पुरत्या दवाखान्यात राहताही येईल. त्यासाठी येथे तशी व्यवस्थाही केली जात आहे, ही सुविधा विनामूल्य असेल, अशी माहिती सुर्वे यांनी दिली.

edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com