Shops and markets in the state are being extended by two hours to keep them open. | Sarkarnama

दुकाने, मार्केट खुली ठेवण्यास उद्यापासून 'इतके' तास वाढविले... 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 जुलै 2020

राज्यातील कंटेनमेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत.  ९ जुलैपासून ही संमती देण्यात येत आहे.  

मुंबई : दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रीत तथा कमी करण्याच्या अनुषंगाने राज्यातील दुकाने तथा मार्केट खुली ठेवण्यासाठी दोन तास वाढवून देण्यात येत आहेत. राज्यातील कंटेनमेंट झोन सोडून इतर क्षेत्रातील दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत.  ९ जुलैपासून ही संमती देण्यात येत आहे. पण, यासाठी आधीच्या आदेशात लागू करण्यात आलेले नियम कायम असणार आहेत. 

मिशन बिगिन अगेन टप्पा ५ अंतर्गत यासंदर्भातील आदेश लागू करण्यात आला.मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या क्षेत्रात मिशन बिगिन अगेन टप्पा २ मध्ये मार्केट तसेच अत्यावश्यक नसलेल्या दुकानांना पी वन – पी टू बेसीस वर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास संमती देण्यात आली होती.

आता दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रीत तथा कमी करण्याच्या अनुषंगाने यासाठी दोन तास वाढवून देण्यात आले आहेत. या महापालिकांमधील कंटेनमेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील मार्केटना आठवड्यातील ७ दिवस परवानगी देण्यात येत आहे.  

दुकानांना पी वन – पी टू बेसीसवर परवानगी देण्यात येत आहे. राज्याच्या उर्वरित भागात मार्केट आणि दुकानांना आठवड्यातील सात दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले ठेवण्यास संमती देण्यात आली आहे. सामाजिक अंतराचे पालन न केल्याचे आढळल्यास किंवा गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यास प्रशासन संबंधीत दुकाने किंवा मार्केट बंद करेल.  मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी या वाढीव वेळेचा संबंधीत मार्केट आणि दुकान मालक वापर करतील.

पुण्यात रोज कोरोना रुग्ण संख्येचा आकडा आठशे ते नऊशेच्या पुढे जात आहे. कोरोनामुळे मूत्यु होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारसह स्थानिक प्रशासनाची चिता वाढली आहे. पुण्यात कोरोना
बाधितांची संख्या वाढत आहे. राज्य व स्थानिक प्रशासनाला चिंतेत टाकणारी ही बाब आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी नवा आदेश काढला आहे. आदेश न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत. 109 बाधित क्षेत्रात प्रशासनाच्या नियमांचे उल्लघंन होते आहे. ही बाबा विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी गांभीर्याने घेतली आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांसह विनाकारण रस्त्यांवर उतरणाऱ्यांना धडा शिकविण्याची भूमिका आता प्रशासनाने घेतली आहे. बेजबाबदारी व्यापारी, नागरिकांवर कारवाईच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
प्रशासनाने लॅाकडाउन केल्यानंतर वेळापत्रक ठरवून दिले होते. पण हे वेळापत्रत काटेकोरपणे कोणी पाळताना दिसत नाही.

सरसकट दुकाने उघडी करण्यात येत आहेत. अशा दुकानांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्दकरण्यात येणार आहे. लग्न समारंभात गर्दी झाल्यास संबंधित कार्यालयाचाही परवाना रद्द करण्यात येणार आहे. ज्या हॅाटेल, दुकानासमोर गर्दी दिसेल, त्याठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. मास्क न घातलाफिरणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख