Shooting at the home of Republican Minority Front president Shakeel Saifi | Sarkarnama

रिपब्लिकन पक्षाच्या 'या' नेत्याच्या घरावर गोळीबार...  

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जून 2020

शकील सैफी यांच्या दिल्लीतील नांगलोई निहाल विहार येथील घरावर अज्ञात तीन व्यक्तींनी अंधाधुंद गोळीबार केला. शकील सैफी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

नवीदिल्ली : रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष शकील सैफी यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. शकील सैफी यांच्या दिल्लीतील नांगलोई निहाल विहार येथील घरावर अज्ञात तीन व्यक्तींनी अंधाधुंद गोळीबार केला. शकील सैफी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

या हल्ल्यात शकील सैफी बचावले आहेत. त्यांच्या सुरक्षा रक्षकाच्या पायावर तीन गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला आहे. या भ्याड हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे.  हल्लेखोरांचा कसून शोध घेऊन त्वरीत अटक कारण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आज त्यांनी हल्ला झालेल्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शकील सैफी यांची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खंबीर असल्याचे सांगत धीर दिला. 
रिपाइं( आठवले) पक्षात अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दिल्लीत शकील सैफी उत्कृष्ट समाजकार्य करीत आहेत. मात्र, काल अज्ञात हल्लेखोरांनी शकील सैफी यांच्यावर हल्ला करण्याचा उद्देशाने त्यांच्या घरावर गोळीबार केला. याप्रकरणी येथील पोलिस आयुक्त सागर यांची भेट घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

 

ही बातमी वाचा : रूग्णालयाच्या चुकीमुळे लहान मुलांना धोका... 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या परिचारिकेने लहान मुलांच्या वार्डमध्ये काम केल्याच्या धक्कादायक प्रकार नुकताच घडला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. या नर्सचा कोरोनाचे रिपोर्ट येण्यापूर्वी चार ते पाच दिवस लहान मुलांच्या वार्डमध्ये तिला काम करण्याची जबाबदारी दिली होती. 

लहान मुलांच्या जीवाशी आरोग्य विभाग खेळत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे लहान मुलांचा जीव धोक्यात आहे, या सर्व लहान मुलांची कोरोना टेस्ट व्हावी, अशी मागणी राणे यांनी लावून धरली आहे. याबाबत सिव्हिल सर्जन डॅा. धनंजय चाकूरकर यांची चैाकशी करून राज्य सरकारने त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना राणे यांनी दिले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख