पिंपरी : हिंदी भाषेचा प्रसार करणाऱ्या केंद्रीय राष्ट्रभाषा समितीच्या कार्यकारी संयोजकपदी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची नियुक्ती झाली आहे. खासदारकीच्या आपल्या पहिल्याच टर्मला गेल्यावेळी बारणे हे या समितीवर सदस्य होते. या टर्मला त्यांची बढती झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी या निवडीवर दिली.
संसदेची ही एकमेव अशी सक्षम समिती आहे की जिचा अहवाल लोकसभेऐवजी थेट राष्ट्रपतींना सादर केला जातो. तिच्या माध्यमातून हिंदी भाषेसाठी कार्य केले जाते. केंद्र सरकारच्या कार्यालयांचा अभ्यास केला जातो. हिंदीचा प्रसार करणे या समितीचा मूळ उद्देश आहे. केंद्र सरकारच्या ज्या कार्यालयांमध्ये हिंदीचा वापर केला जात नाही. त्यांना अधिकाअधिक हिंदी भाषेचा वापर करण्यास समिती भाग पाडते.
१९७६ मध्ये ती अस्तित्वात आलेली आहे. तीत ३० लोकसभेतील २० आणि राज्यसभेतील दहा असे तीस सदस्य असतात. समितीचे अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा आहेत. ही समिती देशभरातील केंद्रीय कार्यालयांमध्ये हिंदी भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम करते. त्याचा आढावा घेते. खासदार बारणे यांनी मागील पाच वर्ष या समितीत सदस्य म्हणून काम केले होते.वरिष्ठ सदस्य म्हणून त्यांची आता समितीच्या संयोजकपदी नियुक्ती झाली आहे.
बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर १ मे पासून नागपूर-शिर्डी वाहतूक सुरू होणार .. https://t.co/fDhyEtlzFB
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 5, 2020
हेही वाचा : आजी, माजी खासदारांची श्रेयासाठी लढाई...महामार्गाचे रुंदीकरण दूरच..
पिंपरी : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणावरून राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये पुन्हा श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. दुसरीकडे गेल्या कित्येक वर्षापासून असलेले हे काम अद्याप सुरु झाले नसल्याने तेथील कोंडी कायमच आहे. फक्त या कामाला मंजुरी मिळाली असून टेंडर प्रक्रिया पार पडल्यानंतर पुढील वर्षीच प्रत्यक्ष सहापदरी रुंदीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे शिरूरचे (जि. पुणे) खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि या मतदारसंघाचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव या दोघांनीही आपल्याच पाठपुराव्यामुळे हे काम (चांडोली टोलनाका ते मोशी टोलनाका) मार्गी लावल्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत हा प्रश्न व त्यामुळे तेथे होणारी कोंडी हा प्रचाराचा मुद्दा होता.

