ते शिवभक्त आहेत...दरोडेखोर नाहीत...संभाजीराजे पुन्हा संतप्त..

खासदार संभाजीराजे संतप्त झाले आहेत.
sr19.jpg
sr19.jpg

शिवनेरी (पुणे) : शिवजयंतीनिमित्त गर्दी करू नये, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. आज शिवजयंतीनिमित्त रायगडावर जमलेल्या शिवभक्तांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या प्रकरणावरून खासदार संभाजीराजे संतप्त झाले आहेत. 

शिवजयंतीनिमित्त काल रायगडावर केलेल्या डिस्को रोषणाई वरून खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून पुरातत्व खात्याला फटकारले होते. आज पुन्हा रायगडावर शिवभक्तांवर झालेल्या लाठीचार्जमुळे संभाजीराजेंनी महाविकास आघाडी सरकारला खडेबोल सुनावले आहे. रायगडावर शिवभक्तांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी संभाजीराजेंनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. संभाजी राजे म्हणाले की ते शिवभक्त आहेत, दरोडेखोर नाहीत.
 
शिवजयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत किल्ले शिवनेरीवर जाऊन शिवजन्म स्थळाचे दर्शन घेतले. किल्ले शिवनेरीवरील स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ मासाहेब आणि बालशिवबांच्या शिल्पाला वंदन करुन विनम्र अभिवादन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी राज्यातील जनतेला, समस्त शिवभक्ताना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.


हेही वाचा : सरकार अल्पमतात..बहुमत सिद्ध करा.. राज्यपालांचे आदेश...

पुदुच्चेरी : पुदुच्चेरीतील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. सरकारला येत्या 22 तारखेला बहुमत सिद्ध करण्यास नायब राज्‍यपाल तामिलिसाई सौंदर्यराजन यांनी सांगितले आहे. पुदुच्चरी येथील काँग्रेसचे सरकार चार आमदारांच्या राजीनाम्यानंतर संकटात सापडले आहे. सरकार अल्पमतात नसल्याचे मुख्यमंत्री नारायणसामी यांचे म्हणणे आहे. पुदुच्चेरी येथे पुढच्या काही महिन्यातच विधानसभा निवडणूक होत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ होण्यास सुरवात झाली आहे. पुदुच्चेरीत येथे काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वातावरण पेटू लागले आहे. गेल्या मंगळवारी किरण बेदी यांनी नायब राज्यपाल पदावरून हटविण्यात आले. किरण बेदी यांना पदावर हटविल्यानंतर त्यांचा पदभार स्वीकारणाऱ्या तामिलीसाई सौंदर्यराजन यांनी सांगितले की 30 सदस्य असलेल्या विधानसभेत काँग्रेसचे 15 आमदार आहेत. डीएमके ते तीन आणि एक अपक्ष आमदाराचा पाठिंबा आहे. पण काँग्रेसच्या चार आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर सरकारमधील परिस्थिती बदल झाला आहे. काँग्रेस बहुमताचा आकडा जमा करण्यास असमर्थ आहेत. 
  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com