अधिेवेशन उधळून लावण्याचा विरोधकांचा अजेंडा : राऊत

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात विरोधी पक्षांनी त्यांना माहित असलेल्या गोष्टी तपास यंत्रणेला द्याव्यात, असे संजय राऊत यांनी सांगितले.
sanjay27.jpg
sanjay27.jpg

मुंबई : "पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे. याबाबत विरोधी पक्षांनी त्यांना माहित असलेल्या गोष्टी तपास यंत्रणेला द्याव्यात. सर्व आरोपांची चैाकशी सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे डोळे मिटून बसलेले नाहीत," असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, सर्वात आधी पूजा आणि तिच्या कुंटुबियांना न्याय मिळाला पाहिजे, चर्चेतून सगळे प्रश्न सुटतील. चित्रा वाघ यांनी त्यांना माहित असलेल्या गोष्टी तपास यंत्रणेला द्याव्यात. लोकांचे प्रश्न विरोधकांनी मांडावे. या प्रकरणाहून अधिवेशन उधळून लावण्याचा विरोधकांचा अजेंडा आहे. विरोधकांचा हा अजेंडा चुकीचा आहे.     

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नाशिक येथे आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा पुणे पोलिस, महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. "पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात सरकार पोलिस प्रशासन, बलात्काराला वाचवतंय," असा आरोप चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला. 'राठोड यांना वाचविण्यासाठी महाविकास आघाडीने एकी केली आहे,' असा आरोप वाघ यांनी केला आहे. 'माझ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात मला गुंतविण्याचा सरकारचा डाव आहे,' असे वाघ यांनी सांगितले.

या प्रकरणात सर्व पुरावे असताना वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही, कारण हे कोणी साधी व्यक्ती नाही, तर हे मंत्री आहेत. घटनेच्या दिवशी 100 या क्रमांकावर फोन करून या प्रकरणाशी माझा काहीही संबध नाही, असे अरूण राठोडने पुणे पोलिसांनी सांगितले होते. या दिवशी पोलिस कंट्रोलला गेलेल्या फोनची दखल का घेतली नाही, असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला आहे. 

चित्रा वाघ म्हणाल्या, "सरकार पोलिस प्रशासन, बलात्काराला वाचवत आहे. त्या 12 आँडिओ क्लिप बाबत अद्याप कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नसते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ल असतं...महिला सुरक्षा फक्त भाषणात उरली आहे का... मंत्रीमंडळातले सर्व मंत्री एकसारखे आहेत. सरकारमध्ये व्यभिचाऱ्याचे उदात्तीकरण सुरू आहे."  पूजा चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.   

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुण्याच्या लष्कर न्यायालयात गुन्हा दाखल करण्याबाबतचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. 'पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करावा,' अशी मागणी हा अर्जात करण्यात आली आहे. लीगल जस्टीस सोसायटीतर्फे अॅड भक्ती पांढरे यांनी काल लष्कर न्यायालयात हा अर्ज केला आहे.   
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com