सुधीरभाऊंचे असे विनोदी कार्यंक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील... - Shiv Sena MP Sanjay Raut criticizes BJP leader Sudhir Mungantiwar | Politics Marathi News - Sarkarnama

सुधीरभाऊंचे असे विनोदी कार्यंक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 मार्च 2021

हे सरकार वाच वर्ष टीकेल. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची चिंता करू नये.

मुंबई : "महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करीत आहेत. हे सरकार वाच वर्ष टीकेल. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची चिंता करू नये. सरकार मजबुतीनं काम करीत आहे," असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. "महाराष्ट्रात सत्ता पालट होईल," असे व्यक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच केले होते. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मिश्किलपणे प्रतिक्रिया दिली आहे. राऊत आज पत्रकारांशी बोलत होते.

  

राऊत म्हणाले, "राज्यातील सरकार दोन महिन्यात, सहा महिन्यात पडेल, असे विरोधक नेहमी म्हणत असतात. त्यांनी अशा तारखा देणं बंद करावं. अधिवेशानात विरोधी पक्ष म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. सुधीरभाऊंनी सांगितले की तीन महिन्यात सरकार पडेल. ते चांगला विनोद करतात. लवकर महाराष्ट्रात नाट्यगृह सुरू होत आहेत. मला काही नाट्य संस्थांच्या मालकांचा फोन होते. त्यांना काही सवलत हव्या आहेत. मला त्यांची गरज वाटत नाही, सुधीरभाऊंचे असे विनोदी कार्यंक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील. पुढील साडेतीन वर्ष हे सरकार अंत्यत मजबूतीने चांगले काम करेल. सुधीरभांऊनी किंवा भाजपने त्यांची चिंता करू नये. 

"सुधीरभाऊ उत्तम विनोदी भूमिका करतात, कधी कधी खलनायकही सिनेमा पुढे घेऊन जातो. नायकाबरोबर खलनायकही ताकदीचा लागतो. आम्ही जेव्हा सिनेमा पाहायचो तेव्हा प्राण, शक्ती कपूर, अमरीश पुरी, निळू फुले, राजशेखर हे खलनायक होते. खलनायकांवरही सिनेमे चालत असतात, त्यामुळे विरोधकाचा हा महासिनेमा आहे. सुधीर मुनगंटीवार किंवा देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांनी राज्यात आपआपल्या भूमिका वठविल्या आहेत. त्यामुळे पुढील साडेतीन वर्ष या राज्यातील वातावरण हे खेळीमेळीचं असेल, असे राऊत यांनी नमूद केलं.
  
'सामना'मध्ये अग्रलेख आला म्हणजे घाव वर्णी लागलेला असतो, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, ते 'सामना' वाचतात, हे त्यांनी कबूल केलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. देवेंद्रजी सामना वाचत राहा, सामना वाचणं ही सुंदर सवय आहे, महाराष्ट्रात आणि देशात काय घडतं याची सत्य माहिती 'सामना'तून मिळते. संपूर्ण जग 'सामना'ची दखल घेते. देवेंद्रजी यांनाही चांगली सवय लागली असेल तर त्यांचं कैातुक आहे, असे राऊत म्हणाले.   

सचिन वाझे विषयी शिवसेनेची भूमिका काय असेल यावर ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. गृहमंत्र्यांनी वाझेंची बदली केली आहे. चैाकशी सुरू असल्याने वाझे पदावरून दुर झाले आहेत, सरकारची कारवाई अशाच प्रकारची असते.  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी सुध्दा याच पद्धतीने कारवाया केलेल्या आहेत. 'आधी फाशी आणि नंतर चैाकशी' हे आपल्या घटनेत, कायद्यात लिहिलेलं नाही. 'शंभर अपराधी सुटले तरी चालेल पण एक निरपराधी फासावर जाता कामा नये,' असं घटनेत लिहिलं आहे, असे राऊत यांनी सांगितले.   
Edited  by :  Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख