शिवसेनेच्या मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली ही तक्रार 

सरकार शिवसेनेचे असले तरी आमची कामे होत नाहीत. निधी मिळत नाही अन मुख्यमंत्री कार्यालयात आम्हाला कुणी विचारत नाहीत, अशी तक्रार आज (ता. 9 जुलै ) शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांना निधी मिळतो; आम्हाला नाही अशी तक्रारही करण्यात आली आहे.
Shiv Sena minister made this complaint to Uddhav Thackeray
Shiv Sena minister made this complaint to Uddhav Thackeray

मुंबई : सरकार शिवसेनेचे असले तरी आमची कामे होत नाहीत. निधी मिळत नाही अन मुख्यमंत्री कार्यालयात आम्हाला कुणी विचारत नाहीत, अशी तक्रार आज (ता. 9 जुलै ) शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांना निधी मिळतो; आम्हाला नाही अशी तक्रारही करण्यात आली आहे. 

कोरोनाची परिस्थिती सुधारल्यावर योग्य ती पावले उचलू, असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्र्यांना शांत केल्याचे समजते. त्यानंतर कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी वेगवेगळ्या सूचना आणि सल्लामसलत करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना बोलावून घेतले होते, असे सांगण्यात आले.

वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. अन्य काही मंत्री डिजिटल माध्यमातून या बैठकीत सामील झाले होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस गेल्या काही दिवसांत सक्रीय झाली आहे. आपण बैठक घेवून काही प्रश्नांवर चर्चा करायला हवी, असे शिवसेनेच्या मंत्र्यांचे मत होते. उद्धव ठाकरे यांनी या इच्छेची दखल घेत आज ही बैठक बोलावली होती.

राज्यात विशेषत: मुंबईलगत परिस्थिती भीषण होत असल्याने तेथील रुग्णव्यवस्था उत्तमरित्या सुधारण्याचे आदेश द्यावेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काय करावे, याची सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली. त्यानंतर मेट्रोबद्दलचे करार करण्यात आले. 
 
शिवसेनेचे मंत्री म्हणाले, साहेब, पुन्हा `पारनेर` होईल : त्यावर उद्धव ठाकरेंनी दिले हे उत्तर...

राज्यभरातील कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मंत्र्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक घेतली. काही मंत्री बैठकीसाठी `मातोश्री`वर गेले होते तर काही आॅनलाइन या चर्चेत सहभागी झाले होते.

राज्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर बांधणीची या वेळी चर्चा झाली. तसेच प्रत्येक मंत्र्यांच्या जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती कशी आहे, याचा आढावा घेण्यात आला. या चर्चेत स्वाभाविकपणे पारनेर येथील सेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीने घेतल्याचा आणि ते परत दिल्याचा मुद्दा उपस्थित झाला. 

राष्ट्रवादी काॅंग्रेस आक्रमकपणे विस्तार करून शिवसेनेला अडचणीत आणेल, असा सूर काही मंत्र्यांनी लावला. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या वेळी ही भीती जास्त असेल असेही या मंत्र्यांनी सांगितले.

त्यावर ठाकरे म्हणाले की काही काळजी करू नका पुन्हा पारनेर सारखी घटना होऊ नये यासाठी मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच अशा गोष्टींबाबत आपण सावध असायला हवे, अशीही सूचना त्यांनी केली. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com