अंगावर आलं की बोंबलायचं, ही शिवसेना नेत्यांना सवयच..

शिवसेनेचे नेते रोज आरोप करत असतात, काम कमी आणि आरोप जादा असा त्यांचा रोजचा उद्योग झाला आहे. त्यामुळे या आरोपांकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. ईडी ही स्वतंत्र संस्था आहे, त्यांना कारवाईचे अधिकार आहेत, ते त्यांच्या पद्धतीने काम करतात.
Mla Gopichand padalkar news
Mla Gopichand padalkar news

औरंगाबाद ः अंगावर आलं की बोंबलायचं ही शिवसेनेच्या नेत्यांची सवयंच आहे. रोज काही तरी आरोप करायचे, काम कमी आणि आरोप जास्त हेच त्यांचे उद्योग झाले आहे. त्यामुळे त्यांची टिका, आरोप फार मनावर घ्यायची गरज नाही, अशा शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसनेनेवर हल्लाबोल केला. दिवाळीत बोंबलायची शिवसेनेला सवयच असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या ठाणे येथील घर आणि कार्यालासह दहा ठिकाणी ईडीने आज सकाळी धाडी टाकत कारवाई केली. विशेष म्हणजे सरनाईक घरी नसतांना ही कारवाई झाल्याने शिवसेना चांगली आक्रमक झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, असे सांगत या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया दिली. यावर आता भाजपकडून देखील प्रत्युत्तर येऊ लागले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, शिवसेनेचे नेते रोज आरोप करत असतात, काम कमी आणि आरोप जादा असा त्यांचा रोजचा उद्योग झाला आहे. त्यामुळे या आरोपांकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. ईडी ही स्वतंत्र संस्था आहे, त्यांना कारवाईचे अधिकार आहेत, ते त्यांच्या पद्धतीने काम करतात.

पण अंगाशी आलं की बोंबलायंच हा शिवसेनेचा धंदा झाला आहे. दिवाळीत तर यांचे नेते अधिकच बोंबलतात. संजय राऊत यांनी शंभर जणांची यादी देतो असे आव्हान दिले आहे, त्यांनी ती यादी द्यावी, ईडी त्याचीही तथ्य असेल तर चौकशी आणि कारवाई करतील, असेही पडळकर यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com