शरद पवारांचे पुढील दोन आठवड्यांचे सर्व कार्यक्रम रद्द

शरद पवार यांच्यावर 31 मार्च रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
Sharad pawars programs and travel plans postponed for the next  two weeks
Sharad pawars programs and travel plans postponed for the next two weeks

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे बुधवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवारांचे पुढील दोन आठवड्यांचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

शरद पवार यांना रविवारी पोटदुखीच्या त्रास होऊ लागल्याने रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर बुधवारी (ता. 31) पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

पवार यांच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज असल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. त्यानंतर पुढील 10 दिवस ते रुग्णालयात असतील. त्यानंतर काही दिवस घरी आराम करणार आहेत. त्यामुळे त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम, नियोजित दौरे दोन आठवडे पुढे ढकलण्यात आले आहेत, अशी माहिती शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनी दिली. शरद पवार हे ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये जाणार होते.

दरम्यान, मलिक यांनी ट्विटवरून दिलेल्या माहितीनुसार, पोटदुखीचा त्रास होत असल्याने पवारसाहेबांना काल रात्री अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची तपासणी केल्यानंतर एन्डोस्कोपी व शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या समस्येमुळे सध्या त्यांना सुरू असलेली रक्त पातळ होण्याची औषधे थांबविण्यात आली आहेत. त्यांना ता. 31मार्च रोजी रुग्णालयात दाखल केले जाईल. यादिवशी एन्डोस्कोपी व शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती मलिक यांनी दिली आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com