शरद पवारांनी घेतली दिवंगत आमदार भालकेंच्या कुटुंबियांची भेट  - sharad pawar visited the family of late mla bharat bhalke  | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांनी घेतली दिवंगत आमदार भालकेंच्या कुटुंबियांची भेट 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार आज सरकोली येथे दाखल झाले आहेत.

पंढरपूर : दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांच्या सांत्वन पर भेटीसाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार आज सरकोली येथे दाखल झाले आहेत. अलीकडेच आमदार भारत भालके यांचे अकाली निधन झाले. 

त्यानंतर राज्यभरातील अनेक नेते आणि चाहत्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या भेट घेतली आहे. आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार देखील भालके कुटुंबियांच्या भेटीसाठी आले आहेत. सरकोलीत भालकेंच्या कार्यकर्त्यांनी ही मोठी गर्दी केली आहे.

आमदार भालके हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक आमदार होते. त्यांच्या निधनामुळे पंढरपुरातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या रिक्त अध्यक्षपदाची निवड 21 डिसेंबर रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने आणि आगामी विधानसभा निवडणूक या विषयी शरद पवार काय बोलतात याकडेच विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

संबंधित लेख