शरद पवारांनी कृषी कायद्यात बदल सूचवावा   - Sharad Pawar should suggest changes in the Agriculture Act Ramdas Athavale | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

शरद पवारांनी कृषी कायद्यात बदल सूचवावा  

सागर आव्हाड  
रविवार, 24 जानेवारी 2021

पवारांनी कृषी कायद्यात बदल सुचवायला हवा, असे मत रामदास आठवले यांनी आज व्यक्त केले.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शेतकऱ्यांचे प्रश्न माहित आहे, पवारांनी कृषी कायद्यात बदल सुचवायला हवा, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

रामदास आठवले म्हणाले, "कृषी कायद्याला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन थांबवायला पाहिजे होते. शेतकरी नेतेच आंदोलन करीत आहेत. एपीएमसी बंद करण्याची भूमिका सरकारची नाही. कायदा मागे घेणे योग्य नाही, दबाब आणून कायदे मागे घ्यायला लावणं म्हणजे चुकीचे आहे."

रामदास आठवले म्हणाले, "लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अनेक प्रश्न आहेत, त्याचा आढावा घेतला पाहिजे. याबाबत लवकरच मुंबईत बैठक घेण्यात येईल. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळाले पाहिजे."   
सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहे. या आगीत ज्यांच्या मृत्यू झाला त्यांच्या कुंटुबाला सरकारने दहा लाख रूपये आणि एकाला सीरमने नोकरी द्यायला पाहिजे. 

हेही वाचा : शेतकऱ्याने लिहिलं मोदींच्या आईला भावनिक पत्र.. 

नवी दिल्ली : कृषी कायद्यांना स्थगिती देण्याचा प्रस्तावही फेटाळल्यानंतर कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी संघटनांना शुक्रवारी निर्वाणीचा इशारा दिला. कायद्यांवरील चर्चेदरम्यान कृषीमंत्र्यांसह शेतकरी संघटनांही ठाम राहिल्याने काही मिनिटांतच बैठक संपली. बैठकीदरम्यान कृषीमंत्री शेतकरी संघटनांच्या नेत्यांवर भडकल्याचे दिसून आले. तिन्ही कायदे चांगले असल्याचे सांगत त्यांनी यापेक्षा चांगले काही करू शकत नाही, असे स्पष्ट केले. कृषी कायदे रद्द करावे, यासाठी पंजाबच्या एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. "कृषीविषयक तीनही कायद्याविरोधात देशभर आंदोलन सुरू आहे. हे तीनही कायदे रद्द करण्यासाठी आपण नरेंद्र मोदी यांची मनधरणी करावी," अशा आशयाचे पत्र हरप्रीत सिंह (फिरोजपूर, पंजाब) यांनी लिहिले आहे. ते आंदोलनात सहभागी आहेत. हरप्रीत सिंह यांना आशा आहे की हीराबेन या आपल्या मुलाची मनधरणी करण्यात यशस्वी ठरतील. 

या आंदोलनात ज्येष्ठ शेतकरी, महिला, लहान मुलांसह सहभागी आहेत. कडाक्याच्या थंडीत शेतकरी आजारी पडत आहेत. काहीचा मृत्यू झाला आहे. हे आंदोलन सर्वांच्या काळजीचा विषय ठरले आहे," असे पत्रात म्हटलं आहे.    
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख