4sharad_pawar_ramdas_atawale.jpg
4sharad_pawar_ramdas_atawale.jpg

शरद पवार यांनी एनडीएसोबत यावं...

शरद पवार यांच्या अनुभवाचा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी फायदा होईल," असं मत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

पुणे : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत यावं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करावं. शरद पवार यांच्या अनुभवाचा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी फायदा होईल," असं मत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

"शिवसेनेला पाठिंबा देऊन राष्ट्रवादीचा काहीच फायदा नाही. त्यामुळे शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे," असे त्यांनी सुचवले आहे. रामदास आठवले यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एनडीएत सामील व्हावे.'अस आवाहन केले आहे.

“महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची महायुती व्हावी. ही महायुती प्रचंड शक्तीशाली राहील. त्यामुळे शरद पवार यांना विनंती आहे की, त्यांनी शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढावा. हे माझं वैयक्तिक मत आहे. शरद पवार यांनी याबाबत विचार करावा," अस आठवले यांनी म्हटले आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्रातील अत्यंत कर्तव्यदक्ष नेते आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर विविध प्रश्नांची जाणीव असलेले ते नेते आहेत. देशाचा विकास करण्यासाठी आपण उद्योगक्षेत्रात पडलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी  मांडले आहे.

हेही वाचा : ठाकरे सरकार पाच वर्ष चालेलं..पुढच्या निवडणुकाही एकत्र लढवू... 

पुणे : ठाकरे सरकार पाच वर्षे चांगलं चालेल याच्याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही आणि अशी व्यवस्थित आम्ही काळजी घेतली तर पुढच्या निवडणुकाही आम्ही एकत्र लढवू , असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. 'सामना'ने कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी पवार यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत ठाकरे सरकारचं भविष्य काय? या प्रश्नाला उत्तर देताना पवार बोलत होते. पवार म्हणाले, ''उद्धव ठाकरे यांची काम करण्याची पद्धत आहे, जी मी बघतोय ती आम्हा सगळ्यांच्या पेक्षा वेगळी आहे आणि त्याचं कारण उद्धव ठाकरे यांची कामाची पद्धत ही शिवसेनेच्या कामाची पद्धत आहे. शिवसेनेमध्ये एकदा नेतृत्वाने भूमिका घेतल्यानंतर त्या रस्त्याने आपण जायचं आणि त्याची अंमलबजावणी करायची. ही पद्धत अगदी लहानथोर सगळ्यांच्यामध्ये आहे. या विचाराने तो पक्ष चालला आणि यशस्वीसुद्धा झाला. सध्याचे मुख्यमंत्री त्याच पठडीतले आहेत व कामाची पद्धत तीच आहे. त्याबद्दल माझी काही तक्रारच नाही.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com