माझी संसदेत 52 वर्षे, पण सहकारी साखर कारखान्यात 51 वर्षे अशक्यच !

माझी संसदेत ५२ वर्षांची कारकीर्द पूर्ण झाली आहे, पण एखाद्या सहकारी कारखान्यावर कुणी ५१ वर्षे बसू देईल, असे मला वाटत नाही. मात्र पी. आर. पाटील यांनी ही असाध्य गोष्ट साध्य करुन दाखवली आहे, असे शरद पवार म्हणाले.
shard pawar23.jpg
shard pawar23.jpg

सांगली : "माझी संसदेत ५२ वर्षांची कारकीर्द पूर्ण झाली आहे, पण एखाद्या सहकारी कारखान्यावर कुणी ५१ वर्षे बसू देईल, असे मला वाटत नाही. मात्र पी. आर. पाटील यांनी ही असाध्य गोष्ट साध्य करुन दाखवली आहे. महाराष्ट्रातील एक उत्तम कारखाना ते चालवत आहेत. आपल्यापैकी अनेकांनी साखर कारखाने काढले. मात्र त्यात प्रयोगशीलता वा नाविन्य आहे का ? हा विचार करायला हवा. पण पी. आर यांनी सातत्याने नवनवीन प्रयोग करत उत्तमरित्या राजारामबापू सहकारी साखर कारखाना चालवला आहे," असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यानिमित्त कुरळप (जि. सांगली) येथे झाला. यावेळी पवार बोलत होते. शरद पवार म्हणाले, "पी. आर. पाटील यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात राजारामबापू पाटील यांच्यासोबत झाली. राजारामबापूंनी तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम आयुष्यभर केले. बापू म्हणजे कार्यकर्ते निर्माण करण्याची जणू फॅक्टरीच... त्यांनी घडवलेले कार्यकर्ते आजही महाराष्ट्राच्या विविध भागात उत्तम काम करत आहेत. ५१ वर्षे सहकारी कारखान्याचे संचालकपद आणि २५ वर्षे अध्यक्षपद सांभाळणे ही काही सोपी गोष्ट नाही. माझी संसदेत ५२ वर्षांची कारकीर्द पूर्ण झाली आहे, पण एखाद्या सहकारी कारखान्यावर कुणी ५१ वर्षे बसू देईल, असे मला वाटत नाही. मात्र पी. आर. पाटील यांनी ही असाध्य गोष्ट साध्य करुन दाखवली आहे. 

महाराष्ट्रातील एक उत्तम कारखाना ते चालवत आहेत. आपल्यापैकी अनेकांनी साखर कारखाने काढले. मात्र त्यात प्रयोगशीलता वा नाविन्य आहे का ? हा विचार करायला हवा. पण पी. आर यांनी सातत्याने नवनवीन प्रयोग करत उत्तमरित्या राजारामबापू सहकारी साखर कारखाना चालवला आहे." 

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जयप्रकाश दांडेगावकर यांची राज्य सहकारी साखर कारखाना फेडरेशनच्या अध्यक्षपदाची मुदत संपत आहे. या रिक्त होणाऱ्या जागेवर पी. आर. पाटील यांची नेमणूक व्हावी, असे जयप्रकाश दांडेगावकर यांनी मला सुचविले आहे. 
पी. आर. पाटील यांच्यासारखा अध्यक्ष राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाला लाभला तर सर्वच साखर कारखानदारांना एक नवी दृष्टी मिळेल. त्याचा फायदा शेतकऱ्यांना आणि कारखानदारांना होईल, याची मला खात्री आहे. अमृत महोत्सवी समारंभ सोहळ्याच्या निमित्ताने पी. आर. पाटील यांना दीघार्यु,  उत्तम आरोग्य लाभो, त्यांच्या हातून समाजाची आणि शेतकऱ्यांची अशीच सेवा घडो, ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, अशा भावना पवार यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com