शरद पवारांनी दिल्या त्यांना लग्नाच्या शुभेच्छा.. - sharad pawar parked his car on the road and wished suraj shinde and kajal marriage | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांनी दिल्या त्यांना लग्नाच्या शुभेच्छा..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

पवार आणि नव वधूंच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे लाखो चाहते आहेत. अशाच एका आपल्या चाहत्याला रस्त्यात गाडी उभी करून शरद पवार यांनी लग्नाच्या शुभेच्छा देत भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी आशीर्वाद दिला. पवार आणि नव वधूंच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

शरद पवारांच्या प्रेमाने नव वधू आणि वर अक्षारशा भारावून गेले. पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शेतकरी तरूण सुरज शिंदे यांचा काजल हिच्या बरोबर कालच विवाह झाला होता.

दरम्यान आज शरद पवार पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे येणार असल्याची माहिती मिळाताच सुरज आणि काजोल हे दोन्ही नव दापंत्य पवारांच्या भेटीसाठी आले होते.

पवारांनी ही रस्त्यावर गाडी थांबवून नव वधू वरांना आशिर्वाद देवून शुभेच्छा दिल्या. पवार आणि नव वधूंच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा : भाजपचे नेते कल्याणराव काळे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?
पंढरपूर : सोलापूरचे भाजप नेते सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आज सरकोली (ता.पंढरपूर) येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि कल्याणाराव काळे एकाच मंचावर आले होते. यावेळी कल्याणाराव काळे यांनी आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पध्दतीने काम करू असं जाहीर वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काळेंचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चत असल्याचे मानले जात आहे. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार आज सकाळी सरकोली येथे आले होते. या सर्व कार्यक्रमात कल्याणराव यांची उपस्थिती लक्षवेधून घेणारी होती. मागच्या काळात दुष्काळ आणि आर्थिक मंदीमुळे साखर कारखाने अडचणीत होते. त्यावेळी पवार साहेबांनी पंढरपूरच्या तिन्ही साखर कारखान्यांना मोठी मदत केली आहे. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले आहे. आमच्यापण काही चुका झाल्या परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख