मोदींना सातव म्हणाले , "अब तू दवाई खरीद या विधायक तेरे जमीर पर निर्भर है.." 

राजीव सातव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. याबाबत सातव यांनी एक टि्वट केले आहे. या टि्वटवर सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा सुरू आहे.
4.jpg
4.jpg

पुणे : कॅाग्रेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली आहे. पंतप्रधान सहायता निधी, कोरोना आणि सध्या राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर राजीव सातव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे.  याबाबत सातव यांनी एक टि्वट केले आहे. या टि्वटवर सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा सुरू आहे.

 "मदद करने वालों ने एक-एक रुपया तेरी झोली में डाल दिया साहब !अब तू दवाई खरीद या विधायक तेरे जमीर पर निर्भर है...." असे टि्वट सातव यांनी केले आहे. यामाध्यमातून त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.

कोरोना महामारीच्या संकटाशी लढा देत असताना पंतप्रधान सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर राजस्थानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. यात कॅाग्रेसने भाजपवर विविध आरोप केले आहे.

राजस्थानमधील अशोक  गेहलोत सरकार पाडण्यासाठी भाजपच्या केंद्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. भाजपने कोट्यावधी रूपयांचे आमिष दाखवून कॅाग्रेसच आमदार खरेदी केले आहेत, असा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.  पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी व कॅाग्रेसच्या आमदारांना फोडण्यासाठी पंतप्रधान सहायता निधीतील पैशांचा वापर केला आहे, असा आरोप या टि्वटच्या माध्यमातून राजीव सातव यांना करायचा आहे, असे हे टि्वट वाचल्यानंतर दिसते. 

मागील काही दिवसांपासून राजस्थानातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या बंडखोरीने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार अडचणीत सापडले आहे. काँग्रेस या संकटासाठी भाजपला जबाबदार धरत आहे. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री व भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी अखेर मौन सोडले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाची किंमत राजस्थानातील जनतेला मोजावी लागत आहे, असे खडे बोल सुनावून त्यांनी लोकहित सर्वोच्च असल्याचे म्हटले आहे. 

कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांना कोट्यवधी रूपयांची लाच दिली जात असल्याचा आरोप गेहलोत आणि कॉंग्रेस नेते करीत आहे. त्यातच ऑडीओ टॅपिंगचे प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणानंतर भाजपने तर थेट सीबीआय चौकशीचीच मागणी केली आहे. तर अशोक गेहलोत, रणदीप सुरजेवाला यांच्यासारखे कॉंग्रेसचे नेते भाजपवर घणाघात करीत आहेत. भाजपने वीस वीस कोटी रुपये बंडखोर आमदार देण्याची तयारी केली असल्याचाही आरोप आहे. तर दुसरीकडे पायलट यांचे समर्थक आमदार न्यायालयात गेले आहेत. त्यांच्या डोक्‍यावर अपात्रेची टांगती तलवार आहे. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com