"अजित पवारांना भाजपच्या गोटात पाठवणे, हा तुमचाच प्लॅन होता का.. ? - Sanjay Raut said that now the alarm and clock in Raj Bhavan have been changed. | Politics Marathi News - Sarkarnama

"अजित पवारांना भाजपच्या गोटात पाठवणे, हा तुमचाच प्लॅन होता का.. ?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

"अजित पवार यांना आम्हीच पाठवले, हे मीच कसे बोलू शकतो. सत्य आम्हाला माहिती आहे, तुम्हाला काय अंदाज बांधायचेत ते बांधा," अशी मोघम टिप्पणी संजय राऊत यांनी केली. 

मुंबई : "अजित पवार यांना भाजपच्या गोटात पाठवणे, हा तुमचाच प्लॅन होता का, अशी विचारणा स्टैंडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने खासदार संजय राऊत यांना केली. ही शक्यता संजय राऊत यांनी पूर्णपणे नाकारली नाही. या प्रश्नावर राऊत यांनी सूचक मौन बाळगले. "अजित पवार यांना आम्हीच पाठवले, हे मीच कसे बोलू शकतो. सत्य आम्हाला माहिती आहे, तुम्हाला काय अंदाज बांधायचेत ते बांधा," अशी मोघम टिप्पणी संजय राऊत यांनी केली. 

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (kunal kamra) याने घेतलेली मुलाखत सध्या चर्चेचा विषय आहे. या मुलाखतीत कुणाल कामरा राऊतांना विचारतो, "तुम्ही अजित पवार यांना पुन्हा एकदा अशाच शपथविधीसाठी राजभवनात पाठवणार का," असा प्रश्न विचारला. तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, आता राजभवनातील अलार्म आणि घड्याळ बदलण्यात आले आहे. त्या प्रकारानंतर राजभवनात पहाटेचा अलार्म लावणे बंद झाले, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा : ऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून महावितरणला दिवाळीची खास भेट..
 
मुंबई : राज्यातील वीज कर्मचार्‍यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे. अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रत्येकी १५ हजार तर विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक यांना प्रत्येकी ९ हजार रुपये बोनस म्हणून मिळाले होते. तसेच ते यावर्षीही मिळणार आहेत. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणमध्ये भरतीसाठी पात्र ठरलेल्या ३६८ अभियंत्यांच्या नियुक्तीचेही आदेश दिले आहेत या आदेशामुळे सर्व नवनियुक्त अभियंत्यांची दिवाळी गोड होणार आहे. आदेशाची अमंलबजावणी ऊर्जा सचिव व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता हे करणार आहेत. 

लॉकडाउन काळात वीज पुरवठा करण्यात, निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली वीज यंत्रणा उभारण्यात, ठप्प झालेला मुंबईचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात उर्जा विभागाने मोठी भूमिका बजावली. हीच बाब लक्षात घेऊन उर्जा विभागाच्या कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना बोनसची दिवाळी भेट जाहीर केली असल्याचं नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
 

दरम्यान, बोनससह अन्य मागण्यांसाठी विविध वीज कर्मचारी संघटांना अतिशय आक्रमक पवित्रा घेतला होता. यातील बोनसची मागणी मान्य करण्यात आल्यामुळे वीज कर्मचार्‍यांचा संप होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख