शिवप्रेमींच्या रेट्यानंतर नावात बदल...

संभाजी बिडी नावानं वितरीत होणाऱ्या बिडीचं नाव बदलण्यात आले आहे.
sambahji21.jpg
sambahji21.jpg

बारामती : राज्यात संभाजी बिडी नावानं वितरीत होणाऱ्या बिडीचं नाव बदलण्यात आले आहे. यापुढे साबळे बिडी नावानं हे उत्पादन बाजारात उपलब्ध होणार आहे.

राज्यातल्या तमाम शिवप्रेमींनी केलेल्या आंदोलनानंतर कंपनीने नाव बदलण्याचा निर्णय जाहीर केला होता. विशेष म्हणजे, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी शिवधर्म फाउंडेशनकडून या बिडीचं नाव बदलण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणही करण्यात आलं होतं.

संभाजी बिडी या नावामुळे छत्रपती संभाजीमहाराज यांचा अवमान होत असल्याचा आक्षेप घेत शिवप्रेमींनी याबद्दल आंदोलन केलं होतं. शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आमरण उपोषणही करण्यात आलं होतं.

त्यानंतर साबळे-वाघिरे कंपनीने या बिडीच्या नावात बदल करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार या बिडीचं साबळे बिडी असं नामकरण करण्यात आले आहे. हा समस्त शिवप्रेमींच्या लढ्याचा विजय असल्याचं शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी सांगितलं.
 

हेही वाचा : अर्णब गोस्वामींच्या विरोधात भाजपचे 'तांडव' कधी...
मुंबई : सैनिकांवरील हल्ल्यांबाबत आनंद व्यक्त करून देशविरोधी भूमिका घेणारे  रिपब्लिक चॅनेलचे अर्णव गोस्वामी व त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या भाजपवर शिवसेनेचे प्रहार केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या  सामनातून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे."जवानांच्या हौतात्म्याचा अपमान करणाऱया गोस्वामीविरोधातही भाजप असे गुन्हे जागोजागी दाखल करणार असेल तर ते खरे मर्द. अर्णब गोस्वामीच्या देशद्रोहासंदर्भातदेखील चर्चा घडली तर पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा आत्मा शांत होईल. शंभर ग्रॅम गांजा कुणाकडे पकडला म्हणून 'तांडव' करणारा मीडिया अर्णबच्या देशद्रोही कृत्यावर 'राष्ट्रीय बहस' करायला तयार नाही. कारण त्यांचे स्वातंत्र्य, राष्ट्राभिमान त्यांनी कुणाच्या तरी चरणावर गहाण ठेवला आहे," असे अग्रलेखात म्हटलं आहे.  तांडव'चे निर्माते व दिग्दर्शकांविरोधात भाजपने उत्तर प्रदेश, बिहारात गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले, पण स्वातंत्र्याचा, राष्ट्रवादाचा लढा इतरांनी लढायचा, हे मात्र राष्ट्राचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणार!सगळाच धंदा झालाय, दोष तरी कुणाला द्यायचा? 'तांडव' सुरू आहे, ते चालतच राहील!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com