मुंडेंविरोधात आंदोलन करणाऱ्या चित्रा वाघ म्हणतात..रेणू शर्मांवर कारवाई करा... - renu sharma withdraws rape case against dhananjay munde bjp leader chitra wagh demands to take action against sharma | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

मुंडेंविरोधात आंदोलन करणाऱ्या चित्रा वाघ म्हणतात..रेणू शर्मांवर कारवाई करा...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी मुंडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. 

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार एका महिलेने केली होती. त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. भाजपने मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यासाठी आंदोलन केले होते. भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी मुंडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. 

मुंडे यांच्यावर यांच्यावरील बलात्काराचा आरोप त्या तरुणीने मागे घेतल्यानंतर चित्रा वाघ यांनी टि्वट करून अशा खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्या महिलांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्या आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की बलात्कारासारखा गंभीर आरोप धनंजय मुंडेवर करत आता तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी तात्काळ कारवाई पोलिसानीं करावी, यामुळे ज्या खऱ्या पिडीता आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो म्हणून खोटे आरोप करणाऱ्यांना शिक्षा व्हायलाचं हवी.

मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली होती. ही तक्रार त्या महिलेने मागे घेतली आहे. या प्रकरणाचे राजकारण होत असल्याने तक्रार मागे घेत असल्याचे या महिलेने सांगितले.  
मुंडे यांच्या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने बैठकही घेतली होती. मात्र, भाजप नेते हेगडे यांच्या आरोपानंतर या प्रकरणात मुंडे यांच्या विरोधातील आरोपाची धार काहीशी बोथट झाली आहे. मुंडे यांच्यावरील आरोपांचे स्वरूप गंभीर आहे. माझ्या पक्षाच्या सर्व वरिष्ठ सदस्यांना याबाबत विश्वासात घेणार आहे. या सर्व वरिष्ठ सदस्यांची मते जाणून घेऊन याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून आम्ही काळजी घेऊ, असे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले होते. पण त्यानंतर मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात आणखी तीन तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्याबाबत पवार यांनी आपली भूमिका मांडली. हे प्रकरण गंभीर असल्याचे विधान आपण केले होते, त्याबाबत आता नवी माहिती प्रश्न निर्माण करणारी आहे. काही तक्रारी लक्षात घेता, यात नक्की काय घडले याचा विचार करायला हवा, असेही पवार म्हणाले होते. 

पहिल्यांदा जी तक्रार होती ती अत्याचार केल्याची तक्रार होती. मिडियातून बऱ्याच गोष्टी पुढे आल्या. मुंडे यांनी आम्हाला जे सांगितले होते की काही दिवसांपूर्वी ब्लॅकमेल होत असल्याची शंका होती. ते स्वतः कोर्टात गेले. त्या आॅर्डर्स आम्हाला दाखवल्या. याचा अर्थ असे काही होणार याची पूर्ण कल्पना त्यांना होती, असे पवार यावेळी म्हणाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख