शेट्टींच्या पदाबाबत पवार म्हणतात, "हे मी कोण सांगणार'? 

राजू शेट्टी ते थोड्याच दिवसांत विधान परिषदेचे सदस्य (आमदार) होतील. ते आमदारच राहतील की राज्य पातळीवरील त्यांना पद दिले जाणार का, या प्रश्‍नावर पवार म्हणाले की, "हे मी कोण सांगणार? याबाबत त्यांनाच विचारले पाहिजे.
 Regarding Shetty's post, Pawar says, "Who am I to say this?'?"
Regarding Shetty's post, Pawar says, "Who am I to say this?'?"

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार हे आज (ता. 29 जून) साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेबाबत केलेला गौप्यस्फोट, तसेच गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टिकेवर भाष्यवर केले. 

याच वेळी त्यांना पत्रकारांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याबाबत प्रश्‍न विचारला. राजू शेट्टी ते थोड्याच दिवसांत विधान परिषदेचे सदस्य (आमदार) होतील. ते आमदारच राहतील की राज्य पातळीवरील त्यांना पद दिले जाणार का, या प्रश्‍नावर पवार म्हणाले की, "हे मी कोण सांगणार? याबाबत त्यांनाच विचारले पाहिजे. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत समझोता होता की विधान परिषदेची एक जागा त्यांच्या संघटनेला दिली जाईल. त्यानुसार आम्ही जे कबूल केले होते, त्याची अंमलबजावणी करत आहोत, हे सांगण्यासाठी राजू शेट्टी आणि माझी बारामतीत भेट झाली होती. 

विधान परिषदेसाठी शेट्टी यांच्याच नावाच्या आग्रहाबाबत पवार म्हणाले, "एक जागा सोडण्याची जबाबदारी आमची आहे. मला स्वतःला असे वाटते होते की शेती प्रश्‍नासंबंधी प्रभावी मांडणी करणारी व्यक्ती सभागृहात असावी. राजू शेट्टी यांचा अभ्यास मी संसदेत बघितला होता. त्यांना शेतीप्रश्‍नांची उत्तम जाण आहे, अशी व्यक्ती राज्याच्या सभागृहात आली तर आम्हाला आनंद वाटेल, यासाठी आम्ही शेट्टी यांच्याबाबत आग्रही होतो.'' 

महाविकास आघाडीतील कुरबुरीबाबत शरद पवार म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे तीनही पक्ष एकत्र काम करीत आहेत. या तीनही पक्षाचे प्रमुख नेतेमंडळी एकत्र बसून कोणताही धोरणात्मक निर्णय घेतात. त्यामुळे सरकारसंबंधी कोणतीही अडचण मला वाटत नाही. 

 फडणवीस काहीही बोलून प्रसिद्धी मिळवतात 

पुणे : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सध्या भरपूर वेळ आहे. त्यामुळे ते काहीही बोलून प्रसिद्ध मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात फडणवीस यांना लगावला. 

"ज्यांना जनतेने बाजूला केले आहे, अशा लोकांची आपण कशाला नोंद घ्यायची,' अशी उपहासात्मक टीकाही पवार यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केली. 

शरद पवार हे आज (ता. 27 जून) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. 

साताऱ्यातील पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना सध्या भरपूर वेळ आहे. त्यामुळे ते काही ना काही बोलून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत असतात. या पेक्षा यात दुसरे काहीही नाही. 

पडळकर यांच्याबाबत पवार म्हणाले की, माढा मतदारसंघात त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली, त्या ठिकाणी डिपॉझिट जप्त झाले. बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली, त्या ठिकाणीही त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. तसेच, सांगली लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांना जनतेने स्वीकारले नाही. ज्यांना जनतेनेच बाजूला केले आहे, अशा लोकांची आपण कशाला नोंद घ्यायची, अशा शब्दांत पडळकर यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्या टिकेकडे शरद पवार यांनी दुर्लक्ष केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com