राऊतांच्या 'त्या' विधानाने मंत्र्यांच्या पोटात गोळा !

कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'मंत्रीकपात' करावी लागेल.
Sanjay Raut1
Sanjay Raut1

मुंबई : ''तीन महिन्यापासून अनेक मंत्री आपल्या गावात, जिल्ह्यात कोरोनाचा मुकाबला करीत आहे. ते तीन महिन्यापासून मुंबई, मंत्र्यालयाकडे फिरकले देखील नाही, ही परिस्थिती अशीच राहिली तर, कामगार कपातीप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'मंत्रीकपात' करावी लागेल,'' असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या 'रोखठोक' या सदरात त्यांनी हे विधान केले आहे. 

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांबाबतही त्यांनी मोठे विधान केले आहे. तर माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊत यांनी टीकेचा बाण सोडला आहे.  खाती वाटप करीत असताना जे आपल्याला चांगले 'मलईदार' खाते मिळावे, यासाठी भांडत होते. त्यांना त्यांच्या आवडीची खाती मिळाल्यानंतरही त्याचा काहीही उपयोग झाला नाही, शपथ घेतल्यानंतर मंत्री म्हणून मिरवण्याची सोय सध्याच्या परिस्थितीत राहिली नाही. ते कोरोनाची लढाईत आपल्या जिल्ह्यामध्ये लढत आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालय, मंत्रालयात एक प्रकारची शांतता पसरली आहे. 

शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत केली पाहिजे, याविषयी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फड़णवीस यांचा तीळपापड झाला आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहावे, असे फडणवीस म्हणतात. आपल्याच पंतप्रधानाना पत्र लिहिण्यावाचून फडणवीस यांना कोणी रोखले आहे, असा रोखठोक सवाल राऊत यांनी फडणवीस यांना केला आहे.

ते पुन्हा पुन्हा राजभवनाची पायरी चढतात

राज्य सरकारच्या अपयशाबाबत ते आणि त्यांचे सहकारी पंतप्रधान, राज्यपाल यांच्याकडे नेहमी तक्रारी करीत असतात. राज्य सरकार बरखास्त कसे होईल, या त्यांचा एकमेव कार्यक्रम असतो. महाराष्ट्राचे विरोध पक्षनेते पुन्हा पुन्हा राजभवनाची पायरी चढतात. राज्य सरकार कोरोनाचा मुकाबला करण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा त्रागा ते करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com