सरकार चालविणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही... : दानवेंची चौफेर टीका - Raosaheb danave criticizes Thaceray govt in his style | Politics Marathi News - Sarkarnama

सरकार चालविणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही... : दानवेंची चौफेर टीका

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

दानवे यांच्या वाक्यांनी सभेत हास्याचे स्फोट

पैठण : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत `माझं कुटुंब माझी जबाबदारी` हि कसली जबाबदारी आहे, असा सवाल विचारला. एकट्या मुख्यमंत्र्यांनाच बाहेर पडले तर कोरोना होतो का? माजी मुख्यमंत्री किती जिल्ह्यात फिरले आणि आजी मुख्यमंत्री किती जिल्ह्यात फिरले, ते जनतेला माहिती आहे. नसेल माहिती तर आता जनतेला माहिती होईल, अशी त्यांच्या शैलीत कडवट टीका केली.

मी स्वत: राज्याच्या अनेक ठिकाणी जाऊन आलो. जनतेची कामे केली. तरी पण मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडले नाहीत, अशा शब्दात दानवे यांनी टीका केली. आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना सर्व मदत केली. पण हे सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर देखील जायला तयार नाही. या राज्याची अवस्था `अमर, अकबर, अँथनी` सारखी झालीय, अशी टीका मी केली तर माझ्यावर सारे तुटून पडले. पण या तीन पक्षांच्या तिघांची तोंडे तीन दिशांना आहेत.

मराठा आरक्षणासारखा विषयावर सरकारचे एकमत नाही. त्यावर एकत्र बसा चर्चा करावी, असं सरकारला वाटत नाही. सारी जबाबदारी अशोक चव्हाणांवर टाकून हे सरकार मोकळे झाले आहे. कोणाचा कोणाला मेळ नाही. `सरकार चालवणं येड्या गबाळ्याचे काम नाही. त्याला काम करणाराच माणूस लागतो,` अशा शब्दांत दानवे यांनी सरकारवर तोफ डागली.

अतिवृष्टी भागात तीन दिवस देवेंद्र फडणवीस करणार दौरा
मुंबर्ई : राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दि. 19 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा दौरा करणार आहेत.

दि. 19 ला ते बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी, दि. 20 रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी दि. 21 रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत 9 जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख