Ram belonged to everyone | Sarkarnama

"राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे..." 

संपत मोरे
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

'रामराम म्हणताना तू ही राम आणि मी ही राम हे अपेक्षित असतं'. आपण पिढ्यान् पिढ्या असेच वागत आलो आहोत.

पुणे :  "राम आपला एकट्याचा नव्हता, तर तो सगळ्यांचा होता आणि राहणार. शेवटचा श्वास घेताना राम म्हणणाऱ्या गांधींजींचा राम, वारकऱ्यांना सामाजिक समता शिकवणारे ज्ञानदेव तुकाराम. आपल्याच शेतात अयोध्या समजून शेतात राबणारा एखादा सखाराम. राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे," असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी आज सकाळी फेसबुकवर पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"रामप्रहरापासून आपला दिवस सुरू होतो. जय जय राम कृष्ण हरी हा जगण्याचा मंत्र असतो. रामराम ही एकमेकांच्या ओळखीची खुण असते. साने गुरूजी म्हणायचे, 'रामराम म्हणताना तू ही राम आणि मी ही राम हे अपेक्षित असतं'. आपण पिढ्यान् पिढ्या असेच वागत आलो आहोत.

राम आपला एकट्याचा नव्हता, तर तो सगळ्यांचा होता आणि राहणार. शेवटचा श्वास घेताना राम म्हणणाऱ्या गांधींजींचा राम, वारकऱ्यांना सामाजिक समता शिकवणारे ज्ञानदेव तुकाराम. आपल्याच शेतात अयोध्या समजून शेतात राबणारा एखादा सखाराम. राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे.

"रामाने राम सेतू बांधला आपण प्रभू श्रीरामाचे विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया. जाती धर्माच्या बाबतीत भल्या भल्या पुरुषांच्या मर्यादा दिसून येतात. निदान मर्यादापुरुषोत्तम रामाच्या बाबतीत असं होऊ नये." असे म्हणत आमदार पवार यांनी, "आजच्या या दिवशी श्रीरामाला एकच प्रार्थना, सबकों सन्मती दे भगवान!!!" अशी प्रार्थना केली आहे.
 
Edited  by : Mangesh Mahale  

हेही वाचा राममंदिर पूर्ण व्हायला लागणार किमान इतकी वर्षे... 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचे भूमीपूजन झाल्यावर अयोध्येतील रामजन्मभूमीवरील प्रस्तावित भव्य मंदिराची निर्मिती सुमारे 3 वर्षांत पूर्ण होईल. त्यानंतर रामभक्तांना या मंदिराच्या गर्भगृहातविराजमान झालेल्या श्रीरामाचे दर्शन व पूजाअर्चा करण्याचा योग येईल, अशी आशा विश्‍व हिंदू परिषदेने व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका 2022 मध्ये आहेत व त्यापूर्वीच राममंदिराचे काम पूर्ण करण्याचासत्तारूढ भाजपचा निर्धार आहे. विहिंपचे केंद्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार यांनी, राममंदिराच्या उभारणीत केवळ सरकारच्या भरोशावर रहाता येणार नाही तर सर्वसामान्यानीही आपापल्या परीने यात वाटा उचलायला हवा, अशी सूचक सूचना केली आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख